खूनाच्या तपासात न्याय सहाय्यक वैज्ञानिकांची मदत”प्रवरा संगम येथील खुनाच्या तपासात एफएसएलची मदत
संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा. दिनांक -27/11/2024
*”खूनाच्या तपासात न्याय सहाय्यक वैज्ञानिकांची मदत”*
*”प्रवरा संगम येथील खुनाच्या तपासात एफएसएलची मदत”*
*”खूनाच्या तपासात न्याय सहाय्यक तज्ज्ञांची मदत”*
दिनांक 4 नोव्हेंबर रोजी प्रवरा गोदावरीच्या पात्रात प्रवरासंगम येथे कल्याण देविदास मरकड रा. तिसगाव याची डेड बॉडी मिळवून आली होती. या संबंधाने कल्याणचा भाऊ प्रसाद भास्कर मरकड यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे नेवासा येथे खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तीन आरोपी अटक केले होते.
दिनांक 1 नोव्हेंबर दिवाळीच्या दिवशी आरोपींनी देविदास मरकड याचा देशी कट्ट्यामधून गोळी झाडून खून केल्यानंतर देविदास याची डेड बॉडी हुंदई क्रेएटाच्या डिक्कीत टाकून प्रवरासंगम येथे आणून पुलावरून नदीपात्रात टाकली होती.
खूनाच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्ह्यात वापरलेली हुंदई क्रेएटा पोलिसांनी यापूर्वीच जप्त केली आहे. क्रेएटा कारमध्ये डेड बॉडी टाकून आणल्याने जैविक पुरावा मिळवण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मुंबई येथील तज्ञांचे पथक बोलवण्यात आले होते. सदरच्या पथकाने आज गुन्ह्यात वापरलेल्या हुंदई क्रेएटा कारची काही सूक्ष्म उपकरणे आणि रसायनांच्या मदतीने बारकाईने तपासणी केली असता मृतक याच्या रक्ताचे डाग कारमध्ये मिळून आले आहेत. सदरच्या रक्ताच्या डागाचे नमुने पोलिसांनी तपासकामी जप्त केले असून ते तपासणीकामी प्रयोगशाळेकडे पाठवणार असून तपासामध्ये चांगला पुरावा प्राप्त झाला असल्याचे सांगितले आहे.
सदर गुन्ह्याच्या पुराव्याला आणखी बळकटी मिळाली असून आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने मदत होणार असल्याचे या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले. तसेच गुन्ह्यातील देशी कट्टा गोदावरी प्रवरा नदीत फेकून दिला असल्याने देशी कट्टा शोधण्यासाठी नेव्हीच्या पाणबुड्यांची मदत घेता येईल का याची चाचपणी चालू असल्याचे सांगितले.