उस्मानाबाद जिल्ह्यातील रेल्वे डब्याच्या एसी केबल ,कनेक्टर चोरी प्रकरणी नेवासा येथील गुन्हेगार जेरबंद
संतोष औताडे – मुख्य संपादक , दिनांक 12/12/2024
*”रेल्वे डब्याच्या एसी केबल कनेक्टर चोरी प्रकरणी नेवासातील गुन्हेगार अटके”*
उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद, पांगरी व ढोकी रेल्वे स्टेशन हद्दीतील रेल्वेच्या एसी डब्यांचे बॉटम व साईडचे तांब्याचे कनेक्टर वायर पारधी चोरट्यांनी कापून काढले व चोरून नेले होते. या अनुषंगाने उस्मानाबाद रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रॉपर्टी ॲक्ट 1966 कलम 6 अन्वये गुन्हे नोंदवले होते. चोरीचे भंगार व जुना माल विकत घेणारा व्यापारी शंकर शामलाल गायकवाड मूळ रा. बीड हा सध्या नेवासा शहरामध्ये भंगारचा व्यवसाय करतो. पारधी चोरांनी चोरलेले रेल्वेच्या डब्याचे साहित्य शंकर गायकवाड यास विकल्यानंतर ते अजिज अल्ताफ पठाण रा. नेवासा यास विकले होते. या अनुषंगाने उस्मानाबाद रेल्वे पोलिसांना सुगावा लागल्यानंतर 1. मोजीनखान अल्ताफखान पठाण 2. जुबेर चांद काकर व 3. जाहीद जमशेद शेख सर्व रा. नेवासा यांना या चोरीच्या प्रकरणी अटक केलेली आहे.
अटकेनंतर उस्मानाबाद रेल्वे पोलिसांनी आरोपींना मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने दि. 12/12/2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे.
वर नमूद तीनही रेल्वे स्टेशन वरून वेगवेगळ्या वेळी रेल्वेच्या डब्यांचे वायर कनेक्टर चोरीला गेल्याने या संबंधाने तीन चोरीचे गुन्हे नोंद केले आहेत. या तीनही चोरीच्या गुन्ह्यामध्ये वरील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी क्राईम टीम सोलापूर, सी.पी.डी. टिम सोलापूर, अनिल शर्मा व उपनिरीक्षक सिताराम जाट लातूर यांनी केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार विजय आमंदे करीत आहेत.
उस्मानाबाद पोलीस मागील एक महिन्यापासून आरोपींच्या मागावर होते. नेवासा पोलिसांनी आरोपींना सीताफिने पकडले.