श्रीरामपूर पोलिस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल गुन्ह्यातील तपासाला मिळणार गती- सोमनाथ वाघचौरे
Autade Santosh22 minutes ago
3
संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा, दिनांक – 14/12/2025
श्रीरामपूर पोलिस दलात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल गुन्ह्यातील तपासाला मिळणार गती- सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर. सविस्तर माहिती – अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल झाली आहे. यामुळे गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळीच त्वरित पुरावे गोळा करून त्यांचे प्राथमिक विश्लेषण करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.
या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, डिजिटल फॉरेन्सिक किट, जैविक, भौतिक व डिजिटल पुरावे जतन करण्यासाठी विशेष युनिट, तसेच फिंगरप्रिंट, व्हिडिओ फूटेज किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ची तपासणी करण्यासाठी अत्यावश्यक साधनसामग्री उपलब्ध आहे.
तपास पथकाला तत्काळ निर्णय घेता यावा, पुराव्यांचा अपव्यय टाळता यावा आणि तपासातील प्रत्येक मिनिट मौल्यवान ठरावा या हेतूने ही व्यवस्था करण्यात आली आहे. या व्हॅनसह कार्य करण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षित पथक तयार करण्यात आले आहे. शहर किंवा जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर गुन्हे घडल्यानंतर न्यायवैद्यक तज्ञांची फॉरेन्सिक टीम बोलवावी लागत होती. ही टीम येण्यासाठी खूप वेळ लागत होता. त्यामुळे अनेक गंभीर गुन्ह्यांचे पुरावे गोळा करण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. परत आता सर्व पुरावे जागेवर उपलब्ध होणार आहे. गुन्हेगारीच्या तपासात एक वैज्ञानिक आणि तांत्रिक मदत पुरवण्याचे काम हि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन करणार आहे. या सर्व गाड्या सीसीटीव्ही ने सज्ज असून पोलीस यंत्रणेशी जोडलेल्या आहे. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला संबंधित गुन्ह्याकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणे शक्य होणार आहे. तसेच गुन्ह्यातील तपासाला गती मिळेल असे सोमनाथ वाघचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी सांगितले आहे. यावेळी जयदत्त भवर उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर, तसेच फॉरेन्सिक टीम उपस्थित होती.