पोलीस उप निरीक्षक श्री . शेख अल्ताफ मोहियोद्दीन यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सराहणीय सेवा मेडल प्रदान
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -07/06/2024
सविस्तर माहिती -पोलीस उप निरीक्षक श्री शेख अल्ताफ मोहियोद्दीन यांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सराहणीय सेवा मेडल प्रदान करण्यात आले आहे. राष्ट्रपती पदक अलंकरण समारंभ
सेवानिवृत्त पोलीस उप निरीक्षक श्री . शेख अल्ताफ मोहियोद्दीन अहमदनगर यांना महामहीम *राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडून* *”सराहणीय सेवा मेडल”* 26 जानेवारी 2022 रोजी जाहीर झाले होते.
सदर राष्ट्रपती पोलीस पदक हे त्यांना दिनांक 06 जुन 2024 रोजी माननीय महामहीम राज्यपाल श्री .रमेश बैस महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे देण्यात आले आहे.
पोलीस अलंकरण समारोहाला अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) श्रीमती सुजाता सौनिक, मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
अल्ताफ शेख यांना पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केले बद्दल 368 बक्षीसे मिळाली आहेत. त्यांनी कोतवाली, तोफखाना, कर्जत पोलिस स्टेशन सह स्थानिक गुन्हे शाखा, नागरी हक्क संरक्षण विभाग या ठिकाणी उत्कृष्ट सेवा केली आहे. त्यांचे वर सर्वां कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.