भेंडा येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत मोफत मसाले निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन.

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक-17/09/2023
सविस्तर माहिती – नेवासा तालुक्यातील भेंडा बु येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अहमदनगर यांच्या मार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोफत मसाले निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणास नागेबाबा परिवार यांचे सहकार्य लाभले आहे. या प्रशिक्षणासाठी दिनांक 18/09/2023 रोजी सकाळी 10 वा मुलाखतीचे आयोजन संत नागेबाबा भक्त निवास भेंडा बु या ठिकणी केले आहे. तसेच दिनांक 20/09/2023 ते 19/10/2023 या कालावधीत सकाळी 11 ते 5 या वेळेत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी यांना शासकीय प्रमाणपत्र तसेच 1000 रू विद्यावेतन देण्यात येणार आहे . तसेच मुलाखती साठी सर्व कागदपत्रे आपल्या सोबत घेऊन यावे अशी माहिती तात्यासाहेब जिवडे (9561737747) अहमदनगर जिल्हा प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले आहे. मा. महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली या मोफत मसाले निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या प्रशिक्षणाच्या सविस्तर माहिती साठी संतोष औताडे-(पञकार) (9764406977, 9921086795) जिल्हा कार्यक्रम समन्वयक अहमदनगर यांच्या सोबत संपर्क साधावा. या प्रशिक्षणात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अहमदनगर यांच्या कडून करण्यात आले आहे आहे. आॅनलाईन फॉर्म लिंक मध्ये Officer name jiwade T p Code- 24 टाकावा