
संतोष औताडे- नेवासा प्रतिनिधी दिनांक -09/09/2023
सविस्तर माहिती -भेंडा तालुका नेवासा येथे जालना जिल्ह्यातील सराटी येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व व्यापारी असोसिएशन व ग्रामस्थ यांनी विनंती केल्यानुसार सर्व व्यापाऱ्यांनी भेंडा गाव बंद ठेवून आपला निषेध व्यक्त केला . आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला, सकाळी दहा वाजता बस स्थानक चौकात निषेध सभा घेण्यात आली त्याप्रसंगी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माजी सरपंच गणेश पाटील गव्हाणे यांनी शांततेत चालू असलेल्या अंतरवाली सराटी येथील महिला व पुरुष आंदोलकावर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये राज्य शासन केंद्र शासन सुप्रीम कोर्ट सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन जीआर काढावा मराठा समाजातील जे अतिशय गरीब लोक आहेत त्यांना तात्काळ आरक्षण लागू करा याप्रसंगी नामदेवराव निकम शरद आरगडे सागर महापूर अभिराज आरगडे रोहित रुईकर किशोर गव्हाणे शुभम गव्हाणे अभिजीत पोटे रवींद्र गव्हाणे भैय्यासाहेब निकम सोपान महापूर बाळासाहेब वाकडकर अशोकराव मिसाळ काशिनाथ अण्णा नवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी अशोकराव गव्हाणे बाळासाहेब गव्हाणे बाबासाहेब गव्हाणे विशाल शिंदे सतीश शिंदे साबळे विष्णू डॉ दिलीप यादव सुनील मुळे, राजेंद्र गव्हाणे, संदीप गव्हाणे वायकर सौरभ देविदास गव्हाणे, शरदराव गव्हाणे सिद्धार्थ नवले गणेश शिंदे, पिंटू शेठ वागडकर बाळकृष्ण पुरोहित, कारभारी गरड ,रमेश पाडळे, संतोष औताडे आदी उपस्थित होते. गावातील सर्व व्यापारी यांनी आपली दुकाने पूर्णपणे बंद ठेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा व्यक्त करून शंभर टक्के शांततेत बंद पाळला.