महाराष्ट्र उधोजकता विकास केंद्र अहमदनगर आयोजित भेंडा येथे मोफत मसाले निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न .

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा, दिनांक -21/09/2023
महाराष्ट्र उधोजकता विकास केंद्र अहमदनगर आयोजित मोफत मसाले निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा नुकताच भेंडा येथे संपन्न झाला. . या प्रशिक्षणासाठी नागेबाबा परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. ग्रामीण भागातील महिलांसाठी मोफत मसाले निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र उधोजकता विकास केंद्राने दिली आहे.या संधीचा लाभ घेऊन
महिलांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन भेंडा बुद्रुकच्या सरपंच प्रा.उषाताई मिसाळ यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्त निवास मध्ये
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,जिल्हा उद्योग केंद्र व नागेबाबा परिवार यांचे संयुक्त विद्यमाने
महिलांसाठी आयोजित मसाले निर्मिती प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रसंगी सरपंच प्रा.मिसाळ बोलत होत्या.जलमित्र-पत्रकार सुखदेव फुलारी,प्रशिक्षिका(ट्रेनर) श्रीमती शिरीन सय्यद, डॉ.लहानु मिसाळ,कृष्णा गव्हाणे,सुरेश भुसारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पत्रकार सुखदेव फुलारी म्हणाले की,महिलांसाठी मसाला तयार करणे ही नवीन बाब नसली तरी घरात तयार होणारा मसाला व्यावसायिक दृष्टिकोणातून कसा तयार करायचा याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.यामुळे ग्रामीण भागातील महिलांना उद्योजक होण्याची संधी मिळेल. केवळ प्रशिक्षण न देता महिलांना बाजार पेठेचा सर्व्हे करून तयार माल विकण्याचे तंत्र ही शिकविले पाहिजे.जिल्हा प्रकल्प अधिकारी
तात्यासाहेब जिवडे यांचे मार्गदर्शनाखाली होत असलेले हे प्रशिक्षण महिलांना नक्कीच लाभदायी ठरेल. या प्रशिक्षणासाठी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुषार साळवे यांनी सूत्रसंचालन केले.प्रशिक्षण शिबिराचे कार्यक्रम समन्वयक संतोष औताडे (पञकार )यांनी आभार मानले.