ब्रेकिंग
Trending

जालना येथील मराठा समाज्याच्या मोर्चावर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ भेंडा येथे विविध सामाजिक संघटना कडुन निषेध ध

संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा दिनांक -02/09/2023


जालना येथील मराठा समाज्याच्या मोर्चावर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ भेंडा येथे विविध सामाजिक संघटना कडुन निषेध व्यक्त करण्यात आला होता.सविस्तर माहिती – जालना येथील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज,हवेत गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेचे तीव्र पडसाद छत्रपती संभाजी नगर,बीड, नाशिक आणि जालना, तसेच संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. याचाच निषेध म्हणून नेवासा तालुक्यातील भेंडा येथे विविध सामाजिक संघटना कडुन निषेध व्यक्त करण्यात आला.मराठा आरक्षण आंदोलकावर दडपशाही करून चिरडणाऱ्या सरकारने जाणीवपूर्वक आमच्या माताभगिनी व लहान मुलाबाळांना दहशतीत घेऊन लाठीचार्ज केला . या घटनेच्या निषेधार्थ भेंडा येथे मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने निषेध करण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक कमलेश नवले म्हणाले मराठ्यांनी आता हातात लेखणी घेतली आहे परत एकदा त्यांना तलवार घ्यायला भाग पाडू नये असं मला सरकारला सांगणं आहे आम्हाला या मातीवरती या संविधानावर आणि आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरती प्रेम असल्यामुळे आम्ही शांततापूर्वक मार्गाने आतापर्यंत मोर्चे काढतोय इथून पुढे मोर्चे हे जाणीवपूर्वक सांगतोय की शांततापूर्ण नसून ठोक मोर्चा परत एकदा निघायला सुरुवात होतील याची दखल सरकारने घ्यावी. आंदोलनात बळाचा वापर करुन ते चिरडण्याचा प्रयत्न झाला. अश्रु धुराच्या नळकांड्या फोडून पोलिसांनी लाठीचार्ज केला,हवेत गोळीबार करुन आंदोलकांना हुसकावून लावलं. महिलांना मारहाण केली हे कृत्य निषेधार्थ असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी भेंडा तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे