संपादकीय
Trending

नेवासा तहसील येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व राष्ट्रीय आपत्ती दल NDRF पुणे यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

संतोष औताडे – मुख्य संपादक,नेवासा दिनांक -18/03/2023


सविस्तर माहिती – राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल(NDRF) पुणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणं कार्यक्रम दिनांक-17/03/2023 रोजी नेवासा तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता .या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रथमोपचार पद्धत यांचे प्रशिक्षण देण्यात आले. मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीच्या काळात कशाप्रकारे आपली पुर्व तयारी असली पाहिजे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. पुर,भुकंप, रस्ते अपघात, चक्रीवादळ, यांसारख्या आपत्तीच्या काळात कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी माहिती देण्यात आली. आज सगळीकडे ह्दय विकाराने अनेक जणांचे मृत्यू होत आहेत.एखद्या व्यक्तीला ह्दय विकाराचा झटका आल्यानंतर त्या पेशंट ला (प्रैढ व्यक्तीला) CPR कशा पद्धतीने दिला पाहिजे.त्याचबरोबर लहान मुलांना CPR कसा द्यावा लागतो या विषयावर मार्गदर्शन तसेच प्रत्यशिके यावेळी दाखवण्यात आले. आग लागल्यानंतर काय करायला पाहिजे याविषयी माहिती देण्यात आली. या प्रशिक्षण वेळी आपदा मित्रांनी ही CPR विषयी प्रत्यशिके सादर केली. या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी मा. संजय बिरादार साहेब तहसीलदार नेवासा, BDO घुगे साहेब, किशोर सानप नायब तहसीलदार, NDRF चे इन्स्पेक्टर जालिंदर फुंदे साहेब, इन्स्पेक्टर नितीश कुमार, मेजर विकास राऊत, मेजर घाटगे विजय, मेजर स्वप्नील पाटील, संतोष औताडे (पञकार) , अजय शेलार -आपदा मिञ, ज्ञानेश्वर दहिफळे -आपदा मिञ, हर्षदा शिंदे -आपदा सखी, वैश्नवी नवले -आपदा सखी, तसेच ज्ञानोदय महाविद्यालय येथील NCC विद्यार्थी/ विद्यार्थिनी , नेवासा तालुक्यातील कोतवाल, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे प्रस्ताविक शेख सर यांनी केले होते.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे