
संतोष औताडे (मुख्य संपादक- नेवासा) दिनांक-01/12/2022
सविस्तर माहिती
अहमदनगर येथे गदर-2 या चित्रपटाच्या शूटिंगचा मोठ्या दिमाखात शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभाप्रसंगी उपस्थित राहून लोकसभेतील सहकारी खासदार सनी देओल यांची नगर दक्षिण मतदारसंघाचे खा. डाॅ. सुजय विखे यांनी भेट घेतली.
यावेळी खा. डाॅ. विखे यांनी चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या दोघांनी लोकसभेमध्ये असलेल्या विविध आठवणींनादेखील उजाळा दिला.
शुटिंगसाठी अहमदनगरची निवड केल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे खा. डाॅ. विखे यांनी आभार मानले.
त्याचप्रमाणं चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासनही खा. डाॅ. विखे यांनी या चित्रपटाच्या टीमला दिलं. या चित्रपटाच्या चित्रीकरणातल्या सर्व सदस्यांच्या नगरमच्या मुक्कामामुळे जेवणाच्या व्यवस्थेच्या माध्यमातून अहमदनगर शहरातील उद्योगाला एक व्यावसायिक आधार मिळाला आहे.
तसंच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अनेक चित्रपट प्रेमी देखील अहमदनगरकडे वळतील आणि जिल्ह्याच्या पर्यटनाला एक वेगळी दिशा मिळेल, अशी अपेक्षा खा. डाॅ. विखे यांनी यावेळी व्यक्त केली.