दबंग अधिकारी तुकाराम मुंढे यांची शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती*

संतोष औताडे (मुख्य संपादक- नेवासा) दिनांक- 29/11/2022
. तुकाराम मुंढे यांची शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती. दि.२९ नोव्हेंबर 2022
मंगळवारी सरकारनं राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दोन महिन्यांत पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.राज्यामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून कडक शिस्तीचे ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई मोहीम राज्यभरामध्ये आरोग्य विभागात सुरू केली होती . त्यांची अचानकपणे शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे . त्याबाबतचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत , तर दुसरीकडे भाग्यश्री बानायत यांची विदर्भ स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सेक्रेटरीपदी निवड झाली आहे .
भाग्यश्री बाणाईत, मु.का.अ. शिर्डी संस्थान यांची बदली
सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ
नागपूर या पदावर. व्ही एन सूर्यवंशी अतिरिक्त आयुक्त एम एम आर डी ए यांची बदली आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क या पदावर.सौम्या शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी नांदेड यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर.एस एम कुर्ती कोटी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा या पदावर. एस एस चव्हाण यांची नियुक्ती आयुक्त कृषी या पदावर.नियुक्ती करण्यात आली आहे.साई संस्थानच्या सीईओपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यंत कडकशिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे हे शिर्डीत साईचरणी आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.