गुन्हेगारी
Trending

पाथर्डी व नगर तालुक्यात  घरफोडी करणारा आरोपी ११,२०,००० / – रु .   किमतीचे २ ९ तोळे ( २ ९ ० ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसह जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दिनांक 19/09/2022


पाथर्डी व नगर तालुक्यात  घरफोडी करणारा आरोपी ११,२०,००० / – रु .   किमतीचे २ ९ तोळे ( २ ९ ० ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसह जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.


बातमीतील हकीगत अशी की , दि . ०१/०७/२०२२ रोजी यातील फिर्यादी सौ . कल्पना विलास साढ़े वय ४८ रा . नारायणडोह ता . नगर यांनी फिर्याद दिली की , दिनांक ०१/०७/२०२२ रोजी दुपारी ०१/१५ ते ०३/३० वा . च दरम्यान घराला कुलुप लावून गावात आलेल्या दिंडीच्या कार्यक्रमाला गेले असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच घराचे दरवाजाचे कुलुप तोडून प्रवेश करुन घरातील १,६२,००० / – रु . किमतीचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करुन नेलेवरुन नगर तालुका पो.स्टे . गु.र.नं. T४६२ / २०२२ भादविक . ४५४,३८० प्रमाणे दि . ०१/०७/२०२२ रोजी नगर तालुका पो.स्टे . ला गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हयाचे तपासाबाबत मा . श्री . मनोज पाटील साो . पोलीस अधीक्षक , अहदमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते . नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक श्री . अनिल कटके , सपोनि / गणेश इंगळे , सपोनि / दिनकर मुंडे , पोसई / सोपान गोरे , सफी मनोहर शेजवळ , पोहेकॉ . सुनिल चव्हाण , दत्तात्रय हिंगडे , संदीप घोडके , संदीप पवार , दत्तात्रय गव्हाणे , मनोज गोसावी , बापुसाहेब फोलाणे , पोना / शंकर चौधरी , रविकिरण सोनटक्के , संदीप चव्हाण , दिलीप शिंदे , संदीप दरंदले , ज्ञानेश्वर शिंदे , भिमराज खसें , राहुल सोळंके , संतोष लोढे , लक्ष्मण खोकले , पोकों / मेघराज कोल्हे , योगेश सातपुते , जालिंदर माने चापोहेकॉ / संभाजी कोतकर , उमाकांत गावडे वरील गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , घरफोडी चोरी करणारे इसम नामे गुंडया काळे व त्याचा साथीदार यांनी केलेला असून ते सदर गुन्हयातील चोरी केलेले सोन्याचांदीचे दागिने विक्री करण्यासाठी लाल रंगाची शाईन मोटार सायकलवरुन औरंगाबाद रोडकडून अहमदनगरकडे येत आहेत . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री . अनिल कटके यांनी पथकासह अहमदनगर ते औरंगाबाद जाणारे रोडवरील जेऊर टोलनाका या ठिकाणी सापळा लावला . त्यानंतर थोडयाच वेळात वरील वर्णनाची मोटार सायकलवरुन दोन संशयीत इसम येताना दिसल्याने आम्ही त्यांना थांबण्याचा इशारा केला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच मोटार सायकलवर मागे बसलेला इसम उडी मारुन डोंगराचे दिशेने पळुन गेला . मोटार सायकल चालविणारा पळून जाण्याचा प्रयत्नात असतानाच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी त्यास जागीच पकडून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव स्वरुप उर्फ गुंडया डिस्चार्ज काळे वय २५ वर्ष रा . अंतापूर शिवार , ता . गंगापूर , जि . औरंगाबाद असे असल्याचे सांगितले . त्याची अंगझडती घेतली असता त्याचे जवळ कापडी पिशवी मिळुन आली त्यामध्ये सोन्याचे दागिने असल्याची खात्री झाली

. सदरची कारवाई बी जी शेखर साहेब विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक ,मा मनोज पाटील साहेब पोलिस अधीक्षक अहमदनगर, यांच्या मार्गदर्शनाखाली अजित पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे