अहमदनगर MIDC येथील कंपनीच्या स्टीलच्या बॉल बेअरिंग चोरी करणारे दोन आरोपी ५,२०,००० / – रु . किंचे मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

संतोष औताडे ( मुख्य संपादक – नेवासा) दिनांक : – २६ /०८ /२०२२
अहमदनगर MIDC येथील कंपनीच्या स्टीलच्या बॉल बेअरिंग चोरी करणारे दोन आरोपी ५,२०,००० / – रु . किंचे मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
सविस्तर माहिती- फिर्यादी श्री . वासुदेव अर्जुन खेडकर , वय ४ ९ , रा . भिंगार , ता . नगर हे सीजी पॉवर अॅण्ड सोलुशन मोटर डिव्हीजण , एमआयडीसी अहमदनगर येथे सिक्युरीटी सुपरवायझर म्हणुन नोकरीस आहेत . कंपनीतीमध्ये त्यावेळी डयुटीवर असलेला गार्ड हे आवारात पेट्रोलिंग करत असतांना अज्ञात इसम बीएसआर शॉप मधुन बाहेर पडुन पळुन जातांना दिसले . बीएसआर शॉपची पहाणी केली असता कंपनीतील शॉपचे छत उचकटुन आत प्रवेश करुन ३०,००० / – रु . किंच्या स्टीलच्या बॉल बेअरींग चोरी करुन नेल्या आहे . सदर घटने बाबत एमआयडीसी पोस्टे गु.र.नं. ६२ ९ / २२ भादविक ३८० , ४५७ प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि / श्री . अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर यांना नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते . • नमुद आदेशान्वये पोनि / श्री . अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई / सोपान गोरे , पोहेकॉ / मनोहर गोसावी , देवेंद्र शेलार , पोना / लक्ष्मण खोकले , संदीप दरदंले , दिपक शिंदे , शंकर चौधरी , पोकॉ / सागर ससाणे , मयुर गायकवाड , योगेश सातपुते व चापोहेकॉ / बबन बेरड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन आरोपीचा शोध घेणे बाबत आदेश दिले . विशेष पथक नागापुर , एमआयडीसी व बोल्हेगांव परिसरात फिरुन आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेत असतांना पोनि / श्री अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , इसम नामे समीर ताबोंळी हा त्याचे साथीदारासह एक सिल्व्हर रंगाचे कारमधुन बॉल बेअरींग विक्री करण्यासाठी बोल्हेगांव फाटा येथे येणार असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहितीची खात्री कारवाई करणे बाबत पथकास कळविले . स्थागुशा पथक बातमीतील नमुद ठिकाणी जावुन वेशांतर करून थांबलेले असतांना त्यांना एक सिल्व्हर रंगाचे स्विफ्ट कारमधुन दोन संशयीत इसम कारमधुन उतरतांना दिसले . पोलीस पथक छापा घालुन त्यास ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना त्यास पोलीस पथकाची चाहुल लागताच ते गाडीचालु करुन पळुन जावु लागला . पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले . ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १ ) समीर कादीर ताबोंळी , वय ३६ , रा . लक्ष्मीनगर , पर्वती , ता . जिल्हा पुणे व २ ) संकेत पोपट आढाव , वय २२. रा . रेणुका नगर , बोल्हेगांव असे असल्याचे सांगितले . त्यांचे ताब्यातील सिल्व्हर रंगाचे स्विफ्ट कारची झडती घेतली असता त्यामध्ये स्टिलच्या बॉल बेअरिंग मिळुन आल्या त्या बाबत त्यांचेकडे चौकशी करता सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देवु लागले . त्यांना अधिक विश्वासात घेवून चौकशी करता त्यांनी वरील प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली देवुन गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या २०,००० / – रु.किंच्या बॉल बेअरिंग व ५,००,००० तसेचगुन्हा करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार असा एकुण ५,२०,००० / – रु . किचे मुद्देमालासह ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे . पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे . आरोपी नामे संकेत पोपट आढाव हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर येथे विनयभंग व जबर जखमी करणे असे एकुण ०४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्री . अजीत पाटील साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .