क्रिडा व मनोरंजन
Trending

महाराष्ट्र राज्य 69 वी कबड्डी स्पर्धेत अहमदनगर संघ विजयी.भेंडा येथील रणवीर संघातील चार खेळाडू चमकले.

संतोष औताडे / मुख्य संपादक                  दि.07/03/2022   


      महाराष्ट्र राज्य 69 वी कबड्डी स्पर्धेत अहमदनगर संघ विजयी .भेंडा येथील रणवीर संघातील चार खेळाडू चमकले सविस्तर माहिती- २८ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान ठाणे येथे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अहमदनगर संघाने विजेतेपद मिळवून इतिहास रचला आहे. ६९ व्या महाराष्ट्र राज्य अजिंयपद कबड्डी स्पर्धेत प्रथमच तब्बल ६९ वर्षाने प्रथम क्रमांक मिळवून नगर जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. नगरच्या विजेत्या संघात संघात शंकर गदई (कप्तान), राहुल धनवटे, राहुल खाटीक, राम अढागळे, देविदास जगताप, संभाजी वाबळे, प्रफुल झावरे यांच्यासह
राहुल आगळे, आदित्य शिंदे, अजित पवार, अजिंक्य जीवरक व प्रेम खुरंगे यांचा समावेश होता तर संघ व्यवस्थापक म्हणून सतीश मोरकर होते. ६९ वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा ठाणे येथे पार पडली गुरुवारी या स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई शहर विरुद्ध अहमदनगर यांच्या मध्ये झाला या अटीतटीच्या सामन्यात नगरच्या संघाने मुंबईच्या संघावर गोल्डन रेड च्या माध्यमातून मात करत विजेतेपद पटकावले.या सामन्यात सुरवातीला 25/25 गुणांची बरोबरी झाली होती त्यामुळे या सामन्यात चांगलीच रंगत अली होती. क्षणा क्षणाला बाजी पालटत होती.यानंतर पुन्हा दोन्ही संघांनी 5/5 रेड मधे बरोबरी केली मात्र नगर संघाचा कर्णधार शंकर गदाई याने गोल्डन रेड मध्ये बोनस गुण मिळवत विजेतेपद नगरच्या नावावर कोरले.संघाला प्रोत्साहान देण्यासाठी नगर जिल्हा संघटनेचे सहसचिव विजय मिस्किन, सुनील जाधव, आदी सह काही खेळाडू उपस्थित होते.

२४ वर्षा पूर्वी नगरचे सुपुत्र आणि सध्या मीरा भायदंर येथे सहायक पोलिस उपायुक्त असलेले पंकज शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथे झालेल्या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते मात्र दोन गुणांनी विजेतेपद हुकले होते तेव्हा पासून आजपर्यंत नागरकरांचे स्वप्न अधुरे होते ते स्वप्न अहमदनगर संघाने पूर्ण केले आहे. यापुर्वी
नगरच्या संघाने मुंबई उपनगर, कोल्हापूर,औरंगाबाद,सोलापूर नंदुरबार, या संघांना पराभूत केले होते. स्पर्धेत २५ जिल्हा संघ सहभागी झाले होते. विजयी ठाणे येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिलेल्या रणवीर संघाच्या चार अष्टपैलू खेळाडुंची भेंडा येथे जंगी स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली होती.या सर्व खेळाडूंचा सन्मान  आ.नरेंद्र घुले पाटील, शशिकांत गाडे सर, शितिजभैैैया घुले, पांडुरंग अभंग, शंतनु पांडव, तुकाराम मिसाळ, सोपानराव काळे, परसराम नाकाडे, सोपान महापुर, पञकार संतोष औताडे, राजु वायकर, रघुनाथ मोरकर,राजु वाघडकर,आतिक शेख, वाकचौरे सर अभय लबडे, यांच्या सोबत रणवीर संंघाचेे जुुुणे सर्व खेळाडू व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्कार समारंभाचे सुञसंचालन  पंंडीत सर यांनी केले.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे