विशेष मोहिमे दरम्यान मा . उच्च न्यायालयात शिक्षा झालेले , फरार , पाहिजे व स्टॅण्डींग वॉरंट मधील एकुण १ ९ ६३ आरोपी जेरबंद

संतोष औताडे / मुख्य संपादक दि.07/3/2022
विशेष मोहिमे दरम्यान मा . उच्च न्यायालयात शिक्षा झालेले , फरार , पाहिजे व स्टॅण्डींग वॉरंट मधील एकुण १ ९ ६३ आरोपी जेरबंद करण्यात अहमदनगर पोलिसांना यश आले आहे. जिल्ह्यात मा . उच्च न्यायालयात शिक्षा झालेले , फरार , पाहिजे व स्टॅण्डींग वॉरंटमधील आरोपी मोठ्या प्रमाणावर फरार होते . मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांनी दिनांक ०१ जानेवारी २०२२ रोजी पर्यंत चा आढावा घेवून मा . उच्च न्यायालयात शिक्षा झालेले , फरार व पाहिजे असलेले तसेच स्टॅण्डींग वॉरंटमधील आरोपी विरुध्द दिनांक ०१ जानेवारी २०२२ रोजी पासुन ” विशेष मोहिम ” राबवुन कारवाई करणे बाबत स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर व जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी यांना सुचना दिल्या होत्या . नमुद सुचने प्रमाणे दिनांक ०१ जानेवारी २०२२ ते दिनांक ०६ मार्च २०२२ दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी फरारी , स्टॅण्डींग वॉरंट व मा . उच्च न्यायालयात शिक्षा झालेले आरोपी विरुध्द व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी पाहिजे आरोपी विरुध्द विविध कालावधीमध्ये विशेष मोहिम राबवुन मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधिक्षक , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील फरार असलेले १६ , पाहिजे असलेले ९ ०८६ , स्टॅण्डींग ५ ९ व मा . उच्च न्यायालयात शिक्षा झालेले – ०२ असे एकुण १ ९ ६३ आरोपींना ताब्यात घेवुन योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे. सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटील साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्री . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर व श्रीमती . स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक , श्रीरामपूर यांचे सुचना व मार्गदर्शना जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक श्री / अनिल कटके , स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचेसह पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.