
संतोष औताडे / मुख्य संपादक दि.19/02/2022 सविस्तर माहिती- दिनांक 19/02/2022 रोजी रात्री 03/00 वा . चे सुमा . पोसई समाधान भाटेवाल , पोकों 2510 गणेश लक्ष्मण इथापे , पोकाँ / 2648 / अंबादास किसन गिते , पोकाँ / 143 / केवलसिंग हरिसिंग राजपुत , आप्पासाहेब तांबे असे नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत पाहिजे फरार आरोपीचा शोध घेत असताना पो.नि.श्री.बाजीराव पोवार सो यांनी पोसई भाटेवाल यांना फोन करुन कळविले की , आत्ताच गुप्त / बातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की , नेवासा फाटा ते गेवराई जाणारे रोडवर गोडेगाव चौफुला येथे गोडेगाव गावचे शिवारात रोडच्या क़डेला पाच इसम उभे आहेत त्यांचे हातामध्ये लोखंडी टॉमी . लाकडी दांडके व एक चाकु असे हत्यार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली असुन तुम्ही स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन कारवाई करा असे सांगितल्याने पोसई भाटेवाल यांनी वरील सर्व स्टाफला वरीलप्रमाणे हकिगत कळविल्याने वरील पोलीस स्टाफ असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गेले असता तेथे पाच इसम हे रोडच्या बाजुला उभे होते आमची सरकारी पोलीस जीप पाहताच ते अंधाराचा फायदा घेवून पळू लागले त्यातील एका इसमाचा पोलीसांनी पाठलाग करुन पकडले व चार इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले पकडलेल्या इसमास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव 1 ) कृष्णा नारायण भोसले वय -19 वर्ष रा . नागफणी शिवार नेवासा ता नेवासा.जि.अ.नगर असे असल्याचे सांगितले तसेच पोलीसांनी त्याच्यासोबत असलेल्या इसमाची नावे विचारली असता त्यांनी उडवा – उडवीची उत्तरे दिली . परंतु पोलीसानी अधिक खोलवर चौकशी करुन नावे विचारील असता त्याने त्याची नावे 2 ) नारायण छगन भोसले रा रा . नागफणी शिवार नेवासा बु ता- नेवासा.जि.अ.नगर 3 ) बॉक्सर न-या काळे रा- कोपरगाव ता- कोपरगाव जि -अ नगर 4 ) स्वस्तिक तेरुलाल चव्हाण रा- कोपरगाव ता- कोपरगाव जिल्हा – अ नगर 5 ) कैलिस तेरुलाल चव्हाण रा- कोपरगाव ता- कोपरगाव जि अ नगर असे असल्याचे सांगितले त्याची व ते उभे असलेल्या ठिकाणाची झडती घेतली असता तेथे एक रेडमी कंपनीचा करड्या रंगाचा ड्युअल सीम मोबाईल हॅण्डसेट एक लोखंडी टॉमी दोन लाकडी दांडके , एक चाकु याचं समावेश असुन वरील प्रमाणे हत्यारे त्याचा कडे मिळून आल्याने त्याच्या वर पोलीस ठाणेस पोकों / आप्पासाहेब तांबे यांनी वरील आरोपीच्या विरुद्ध फिर्याद दिली असून त्या अन्वये नेवासा पोलिस स्टेशनला गुन्हा , र , जि , नं . 132 / 2022 , भा , द . वि . क , 399 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढी तपास पोसई समाधान भाटेवाल , हे करीत असुन आज रोजी त्यांना मा , न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली असून सदर आरोपीना पोलिस कोठडी मिळताच तपाशी अंमलदार पोसई समाधान भाटेवाल यांनी मा , पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्टाफ मधील वरील सहका-यांच्या मदतीने तपासला वेग देऊन तपास केला असता , सदर आरोपी कडुन अजुनही मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे . सदर आरोपी कृष्णा नारायण भोसले वय -19 वर्षे रा.नागफणी शिवार नेवासा बु . ता नेवासा.जि.अ.नगर याचेवर महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत ते खालीलप्रमाणे गुरनं . 594/2019 अ.क्र . 1 . 2. 421/2020 292/2021 313/2020 पोलीस स्टेशन नेवासा पोलीस स्टेशन भादवि 392,34 भादवि 379 | राहुरी पोलीस स्टेशन भादवि .395,427 , आर्म अॅक्ट 4/2 सोनई पोलीस स्टेशन भादवि 392,34 नेवासा पोलीस स्टेशन मध्ये आहे. वरील प्रमाणे सदरची कारवाई मा . पोलीस अधीक्षक श्री . मनोज पाटील अहमदनगर , मा . अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर , श्रीरामपुर , मा . उपविभागीय पोलीस अधिकारी श्री . सुदर्शन मुंडे . उपविभाग , शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री . बाजीराव पोवार पोलीस निरीक्षक , नेवासा पोलीस स्टेशन यांच्या अधिपत्याखाली नेमलेल्या पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल . पोकों / गणेश इथापे , केवलसिंग राजपुत , अंबादास गीते , आप्पासाहेब तांबे यांनी आहे .