
संतोष औताडे / नेवासा प्रतिनिधी दि.17/02/2022. गुटख्याच्या गोडावुनवर कोतवाली पोलिसांचा छापा 1कोटी 6 लाखासह 10 आरोपी जेरबंद. सविस्तर माहिती- दि .१६ / ०२ / २०२२ रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री . संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात दोन इसम हे महाराष्ट्र राज्यात गुटखा सुगंधीत सुपारी विक्री करणे व त्याचा साठा करुन सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ कब्जात बाळगण्यास प्रतिबंध असतांना एका मोपेड गाडीवरुन गुटखा व सुगंधीत सुपारीजन्य पदार्थ सोबत घेवून ते विक्री करणेकामी आलेले आहेत व आत्ता गेल्यास मिळुन येतील अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन खात्री करुन छापा टाका असा आदेश दिल्याने पोसई गजेंद्र इंगळे , व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमुद ठिकणी जावुन खात्री करुन पंचासमक्ष छापा टाकला असता त्यांचे कडील गोवा गुटखा सुगंधीत सुपारी विक्री करताना मिळुन आले सदर इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १ ) राकेशकुमारा जगदंबप्रसाद मिश्रा वय ४२ वर्ष रा MIDC अ.नगर २ ) अभिजित गोवींद लाटे वय ३४ वर्ष रा पाईपलाईन रोड अ नगर असे असल्याचे सांगीतले त्यांना त्यांचे ताब्यातील गोवा गुटख्या बाबत अधिक सविस्तर चौकशी केली असता त्यांनी आमचे MIDC येथे गुटख्याचे गोडावुन असुन तेथुनच सगळा माल विक्री करीता वितरीत केला जातो असे सांगीतल्याने सदर पोलीस पथकाने MIDC बोल्हेगाव परिसरात राहणारे रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे यांचे शेती गट क्रं ६५/५ गटमध्ये एका पत्र्याचे शेडमध्ये पंचासमक्ष छापा टाकला असता सदर ठिकाणी खालील आरोपी हे गुटख्याचे पाकीटे मोजताना मिळुन आल्याने त्यांना जागीच ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव ३ ) राहुल कैलासनाथ सिंग वय २४ वर्ष रा दसगर पारा ता कादीपुर जि सुलतानपुर उत्तर प्रदेश ह.रा. MIDC बोल्हेगाव अ नगर ४ ) अझर शकील शेख वय ३१ वर्ष रा दावल मालीक चौक बोल्हेगाव ता जि अहमदनगर ५ ) चंद्रकेश शोभनाथ तिवारी वय ५० वर्ष रा पाडीच डिहीया ता शाहगंज जि जोनपुर उत्तर प्रदेश ह.रा. MIDC बोल्हेगाव अ नगर ६ ) शिवप्रकाश रामकुमार तिवारी वय ४८ वर्ष रा रामडिहीया ता शहागमज जानेपुर उत्तर प्रदेश ह.रा. MIDC बोल्हेगाव अ नगर ७ ) मोहसिन शब्बीर पटेल वय ३६ वर्ष रा बोल्हेगाव नवनाथ नगर ता जि अहमदनगर ८ ) अर्जुन शंकर यादव वय ४६ वरळी कोळी वाडा वारसलेन मुंबई ह.रा MIDC बोल्हेगाव अ नगर ९ ) नितीन सुनिल साठे वय ३२ वर्ष रा सनफार्मा शाळे जवळ बोल्हेगाव अहमदनगर १० ) शादाब शब्बीर पटेल वय २ ९ वर्ष रा बोल्हेगाव नवनाथ नगर ता जि अ नगर ११ ) पत्र्याचे गोडावुन / शेडचे मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे ( फरार ) अस् असल्याचे सांगीतल्याने सदर ठिकाणाची पंचासमक्ष झडती घेतली असता खालील वर्णनाचा व किमतीच गुटखा व सुगंधीत सुपारी व माल वाहतुक करणे करीता वापरातील वाहने असा मुद्देमाल मिळुन आला १ ) ९ ७ , ९ ३ , ९ २० / – रु किं चा गोवा गुटखा व विविध कंपनीचा गुटखा २ ) ३,६२,८०० / – रु किं ची विविध कंपनीची सुगंधीत तंबाखु ३ ) २,३५,००० / – रु किं चे विविध कंपनीचे मोबाईल फोन जुवाकिअं ४ ) २,००,००० / – रु किं च्या ०४ मोपेड दुचाकी गाड्या जुवाकिअं ५ ) ३२,००० / – रु रोख रक्कम १,०६,२३,७२० / – रु किंमतीचा एकुण जप्त मुद्देमाल ( एक कोटी सहा लाख तेवीस हजार सातशे वीस रुपये मात्र. जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे व गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे , पोना गणेश धोत्रे , पोना नितीन शिंदे , पोना सलिम शेख ,पोना संतोष गोमसाळे ,पोना सागर पालवे , पोना राजु शेख , पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम , पोकॉ दिपक रोहकले , पोकाँ अमोल गाढ़े , पोकॉ सोमनाच राउत , पोकॉ अतुल काजळे तसेच पोहेकॉ दिपक साबळे , चापाहेकॉ सतिष भांड , पोना राहुल गवळी , पोकॉ संदीप थोरात, सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंड अ नगर यांनी केली आहे