
संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दिनांक 07/02/2023
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा ते भानसहिवरा रोडवर ऊसाने भरलेल्या भरधाव ट्रकने मोटारसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. ही घटना आज सोमवार दि.6 रोजी दुपारच्या सुमारास घडली.लंकाबाई सखाहरी मुंगसे असे मृत महिलेचे नाव असून नेवासा तालुक्यातील देडगाव येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. लंकाबाई व त्याांचे पती हे दोघे पती-पत्नी नेवासा फाटा येथील खाागी हॉस्पिटलमधुन ट्रिटमेंट घेऊन घराकडे जात असतांना नेवासा फाटा ते भानसहिवरा रोड वर उसाने भरलेला ट्रक क्रमांक MH 43 E 2421 ने मोटारसायकल क्रमांक MH17 BK 1614 हिला पाठीमागुन जोरदार धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला असुन. मयत महिलेच्या पतीने ट्रक चालकाविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे. सदर अज्ञात ट्रक चालका विरोधात नेवासा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नं 175/2023भादवि कलम 3048 अ ,279 337,338,527 कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नेवासा पोलीस करीत आहेत.