गुन्हेगारी
Trending

अवैध गर्भलिंगनिदान चाचणी आरोपींची साखळी थांबता थांबेना आणखी एक आरोपी जेरबंद..

संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा                                    दिनांक-06/06/2026.                  .            अवैध गर्भलिंगनिदान चाचणी आरोपींची साखळी थांबता थांबेना अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची मोठी कसरत.

सविस्तर माहिती – लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरुवातीला लिंगनिदान चाचणी व अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये सुरुवातीला नेवासा येथील डॉक्टर भणगे, दोन एजंट व सहा कुटुंबीय असे एकूण नऊ लोक अटक करण्यात आले होते.
अटक आरोपींकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन,तीन चार चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास करत असताना पुन्हा ढगे नामक आरोपीकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले तसेच अनेक एजंटलाही अटक करण्यात आली. गुन्ह्याचा बारकाईने तपास करत असताना पुन्हा श्रीरामपूर येथील डॉक्टर कुटे व डॉक्टर शेख यांनाही या गुन्ह्यांमध्ये लिंगनिदान चाचण्या करणारे त्याचप्रमाणे अवैध गर्भपात करणारे म्हणून अटक करण्यात आली. त्यानंतर गुन्ह्याचा बारकाईने तपास पोलिसांनी सुरू ठेवला व लिंग निदान चाचणी करणाऱ्या व बेकायदेशीर मशीन विक्री करणाऱ्या पुणे येथील दोन डॉक्टर व एक व्यक्तीला अटक केली. त्यानंतर लगेचच वडगाव मावळ येथील मारुती ढोरे याला आरोपी करून त्याच्याकडून अवैध लिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरत असलेले मशीन जप्त केले.

सदर गुन्ह्याचा तपास अतिशय शाश्त्रोक्त पद्धतीने व बारकाईने करत असताना तपासात असे निष्पन्न झाले की पुणे येथून अटक करण्यात आलेले दोन डॉक्टर व एक मेडिकल साहित्य विक्री करणाऱ्या आरोपींकडून नाशिक येथील निफाड तालुक्यातील 1 डॉक्टर देखील अवैधपणे लिंगनिदान चाचणी करणारे सोनोग्राफी मशीन त्यांच्याकडून विकत घेतल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे यांनी कार्यालयातील पथक नमूद डॉक्टराचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते. त्यानुसार पथकाने निफाड येथील डॉक्टर कुणाल वलटे यांच्यासह तेथीलच मेडिकल चालक सागर उन्हाळ यास देखील ताब्यात घेतले. व या दोघांनाही अटक करण्यात आली

*पुणे येथून अटक करण्यात आलेला मेडिकल साहित्याचा होलसेल विक्रेता नरेंद्र ठाकरे याला अटकेदरम्यान सविस्तर विचारपूस करण्यात आली होती. नमूद आरोपी हा अवैध लिंगनिदान चाचणी करण्यासाठी लागणारे मशीन उपलब्ध करून देत होता. त्यात त्याने माहिती दिलेल्या आणखी एका मेडिकल चालक आरोपीच्या शोधा साठी मागील दहा दिवसापासून पोलीस पाठपुरावा करत होते. आज रोजी सदरचा आरोपी हा श्रीगोंदा तालुक्यातील आरडगाव या गावी शेतामध्ये एका झोपडीत आल्याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा श्री किरण शिंदे यांना व अपर पोलीस अधीक्षक कार्यालय,श्रीरामपूर येथील स्टाफला आरोपीला ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या.*
*त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपीची माहिती खालील प्रमाणे-*
*नाव-जालिंदर रामदास बोरुडे, चाळीस वर्षे,राहणार घोगरगाव तालुका श्रीगोंदा असून तो घोगरगाव मध्ये मेडिकल चालक आहे.*
*आपल्याला सदर होण्याकरता होऊ शकते याची कुणकुण लागल्यामुळे तो गेल्या दहा-बारा दिवसापासून फरार होता. अटक टाळण्यासाठी तो नगर तालुक्यातील हातवळण गावच्या शिवारामध्ये स्वतःच्या शेतामध्ये झोपडी वजा घरामध्ये लपून बसला होता.*
*या अटक आरोपीकडून बेकायदेशीर लिंगनिदानासाठी वापरण्यात येणारे व बेकायदेशीरपणे खरेदी केलेले सोनोग्राफी मशीन मिळून आले असून सदरचे मशीन त्याच्याकडील क्रेटा या चारचाकी गाडीत मिळून आल्याने मशीन तसेच चार चाकी गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.
आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे . विशेष म्हणजे त्यापैकी सहा डॉक्टर आहेत. तर तिघे जण मेडिकल चालक आहे व एक जण मेडिकल साहित्याचा पुरवठा करणारा मोठा पुरवठादार आहे.*

*याशिवाय गुन्ह्यामध्ये आतापर्यंत झालेल्या तपासात अवैध गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारे एकूण 5 सोनोग्राफी मशीन वेगवेगळ्या ठिकाणावरून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. तसेच चार,चार चाकी गाड्या देखील जप्त करण्यात आले आहे.* आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल महादेव प्रकाश कोहक व संदिप पोपट राऊत
दोघे नेम श्रीगोंदा पोलीस स्टेशन, यांनी विशेष मेहनत घेतली.

गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली dysp भारती व सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे हे करत आहे...

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे