ब्रेकिंग
Trending

प्रताप दराडे नेवासा पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलिस निरीक्षक.

संतोष औताडे-मुख्य संपादक नेवासा,                           दिनांक- 11/06/2026.      दबंग पोलिस अधिकारी प्रताप दराडे नेवासा पोलीस स्टेशन चे नवनियुक्त पोलिस निरीक्षक .

सविस्तर माहिती- दबंग व कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची नेवासा पोलिस स्टेशन येथे नियुक्ती झाली आहे तर. सागर ढिकले यांची पुन्हा सायबर सेल येथे बदली करण्यात आली आहे.नगर: नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी परिक्षेत्रातील पोलिस अधिकाऱ्याच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक अशा १३७ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या बदलीला एक वर्ष स्थगिती दिली तर काही अधिकाऱ्यांची बदली अमान्य करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे. तर काही अधिकारी जिल्ह्यात बदलून आले आहेत.अहिल्यानगर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्याकडूनही जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या दोन ते चार दिवसांत बदल्या केल्या जाणार असल्याचे बोलले जात होते... पोलिस ठाण्याच्या अनेक प्रभारी अधिकाऱ्यांची मुदत संपली आहे. तर, अनेकांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरल्याने त्यांची नावे बदलीच्या यादी असल्याचे समजते. पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस कॉन्स्टेबल,व चालक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अशातच नेवासा पोलीस स्टेशन चा पदभार दबंग पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या कडे सोपवण्यात आला आहे. तर सागर ढिकले हे पुन्हा आपल्या सायबर सेल विभागात रूजू होणार आहे. नेवासा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान आगामी काळात प्रताप दराडे यांच्या कडे असणार आहे. प्रताप दराडे यांनी यापूर्वी राहुरी पोलीस स्टेशन, कोतवाली पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक पदावर काम केले आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे