
संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा, दिनांक -28/06/2025
भेंडा येथील सोमेश्वर आघाव चे जी पॅट परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा खु येथील अत्यंत गरीब घरातील विद्यार्थी सोमेश्वर गोरक्षनाथ आघाव याने आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत डिव्हाइन फार्मसी’च्या’
आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्ड
नवी दिल्ली तर्फे घेण्यात आलेल्या
राष्ट्रीय स्तरावरील जी-पॅट या परीक्षेत यश मिळवले आहे.

यात सटाणा येथील ‘डिव्हाइन कॉलेज
ऑफ फार्मसी’च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत
यश संपादन केले. जी-पॅट उत्तीर्ण
विद्यार्थ्यांना एम. फार्मसीच्या दोन
वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी मासिक १२
हजार ४०० रुपये विद्यावेतन दिले जात
असून, ‘नायपर’ सारख्या शासकीय
संस्थांमध्ये प्रवेशासाठी जी-पॅट उत्तीर्ण
विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. परीक्षेत महाविद्यालयातील अश्विनी मांडवडे हिने अखिल भारतीय रँकिंग -1405,
, सौरभ गायकवाडने 2107, सोमेश्वर आघाव 3774 व नायपर 2588,

रुचिता बच्छाव एआयआर 1087रॅंक मिळवत या विद्यार्थ्यांनी
विशेष प्रावीण्यासह यश संपादन केले. सर्व गुणवंतांना संस्थेचे
अध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे, सचिव डॉ. दीपक सोनवणे व विश्वस्थ
जयसिंग दात्रे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील
महाजन, प्रा. डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रा. डॉ. खेमचंद सुराणा व
अन्य प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. सोमेश्वर आघाव हा भेंडा खु येथील रहिवासी असुन जिल्हा परिषद शाळा भेंडा खुप व जिजामाता माध्यमिक विद्यालयात आपले शिक्षण झाले आहे. त्यानंतर डिव्हाईन कॉलेज ऑफ फार्मसी सटाणा नाशिक बी फार्मसी चे शिक्षण घेतले आहे.
