अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस 70 लाखांच्या बनावट नोटा जप्त. राहुरी पोलिसांची कामगिरी.

संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा दिनांक -29/06/2825
राहुरी पोलीस स्टेशन, अहिल्यानगर पोलीसांनी केले महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे
रॅकेट उघड, सोलापूर येथील तीन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बनावट नोटा
तसेच बनावट नोटा बनवण्याचे मशीन व इतर साहित्य असा लाखोंचा मुद्देमाल केला
हस्तगत.
मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे सो यांच्या पोलीस स्टेशन हद्दीत पाई पेट्रोलिंग व
इतर सूचना च्या अनुषंगाने दिनांक 28/6/25 रोजी रात्री 21.30 वा. सुमारास, मा. पोलीस
निरीक्षक संजय ठेंगे व पोलीस पथक राहुरी शहरात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस निरीक्षक
संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की तिन अज्ञात इसम हे काळ्या रंगाची होंडा शाईन
नंबर MH 45 Y 4833 ही मोटरसायकल घेऊन अहिल्यानगर कडून राहुरी कडे भारतीय
चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहेत. लगेच त्यांनी पोलीस पथकाला सूचना
करून राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावून,
तीन संशयित इसम 1 ) पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय 33 वर्ष राहणार सोलापूर 2) राजेंद्र
कोंडीबा चौघुले वय 42 रा. कर्जत जिल्हा अहिल्यानगर 3) तात्या विश्वनाथ हजारे वय 40
रा. पाटेगाव तालुका कर्जत.

घेतली असता त्यांचे अंगझडतीत मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा
मिळून आल्या. पोलीस निरीक्षक यांनी लगेच अॅक्सिस बँक मॅनेजर कैलास वानी यांना
बोलावून सदर नोटा तपासल्या असत्या त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी
आम्ही बनावट नोटा तयार करतो ते ठिकाण दाखवत असे सांगितल्याने माननीय पोलीस
निरीक्षक यांनी सदर ठिकाणी पोलीस पथक रवाना करून शितल नगर टेंभुर्णी येथे समाधान
गुरव यांचे इमारतीत आरोपीने भाड्याने घर भाड्याने घेतलेले असून तेथे 1) xerox करण्याची
मशीन व प्रिंटर 2 ) कटिंग करण्याची मशीन 3) नोटा बनवण्यासाठी चा कागद 4 ) नोटा
मोजण्याचे मशीन 5) लॅमिनेशन मशीन 6) कंट्रोलर युनिट (सर्व मशिनरीची किंमत सुमारे
पाच लाख रुपये) 7) पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 75 बंडल ज्याची किंमत 37,50,000 रुपये
8) दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटा चे एकूण 44 बंडल ज्याची किंमत 8,80,000 रुपये
9) पाचशे रुपयांच्या नोटा प्रिंट मारलेले परंतु कट न केलेले कागदाचे बंडल्स ( 18,00,000
रुपये किमतीचे) अशा सर्व 70,73,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुरनं 724 / 2025 भारतीय न्याय संहिता
कलम – 179,180, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपी हे सराईत
गुन्हेगार आहेत. सदर आरोपीविरुद्ध कुर्डुवाडी पोलीस स्टेशन जिल्हा सोलापूर येथे गुरनं
नंबर 503/2022 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात आरोपी हे 22 महिने तुरुंगात होते.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा. श्री. वैभव
कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, श्री. डॉ. बसवराज शिवपुजे सो.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि. अहिल्यानगर यांच्या सुचना व
मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर. ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोउपनि संदिप मुरकुटे, पोहेकॉ
/सुरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदिप ठाणगे, पोकॉ. सतीश कुन्हाडे, अंकुश
भोसले, प्रमोद ढाकणे, गणेश लिपणे, नदिम शेख पथकाने केली असुन सदर पथकास सपोनि.
सुदाम शिरसाट, पोउपनि राजु जाधव, पोहेकॉ. साळवे, शिंदे, पोकॉ. पाखरे नेमणुक राहुरी पोलीस
स्टेशन जि. अहमदनर यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि संदिप मुरकुटे
हे करीत आहेत.