राहुरी पोलिसांनी मध्य प्रदेशातून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुली ची सुटका करून आरोपीस जेरबंद करून मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधिन केले
संतोष औताडे-मुख्य संपादक, नेवासा
दिनांक 01/02/ 2025
सविस्तर माहिती-मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील धनगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सनावत गावात राहणाऱ्या एका 17 वर्षीय युवतीचे दिनांक 21/ 10/ 2024 रोजी अपहरण करून तिला बारागाव नांदुर येथे आणुन ठेवलेले असल्याबाबत धनगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दिनेश कुमरावत यांनी कळविल्याने राहुरी पोलीस स्टेशन कडील पोलिस नाईक गणेश सानप, पोलीस शिपाई सागर नवले यांनी त्याबाबत माहिती काढून पळून आणलेल्या पीडित मुलीची सुटका करून आरोपी नामे अजय जितेंद्र मोरे वय 18 वर्षे, राहणार जामणी तहसील छेगामा जिल्हा खंडवा ( मध्य प्रदेश ) यास ताब्यात घेऊन मध्यप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन केले.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वात पोउपनि. समाधान फडोळ, पोउपनी.संजय औटी, पोलीस हवालदार गणेश सानप पोलीस शिपाई सागर नवले यांच्या पथकाने केली.