ब्रेकिंग
Trending

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU) यांनी 3 वर्षां पूर्वी हरवलेल्या मुलीचा लावला शोध.

संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा.                     दिनांक 25/01/2025


सविस्तर माहिती- दि. २३/०९/२०२५
३ वर्षापासून तपासावर असलेला गुन्हा उघड करून अपहरीत मुलीचा शोध
प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, दि. ०७/०८/२०२२ रोजी यातील अज्ञात आरोपी याने अपहरीत
अल्पवयीन मुलीस मुलींचे बालगृह अहिल्यानगर येथुन फुस लावुन पळवून नेले होते. सदर बाबत कोतवाली
पोस्टे गुरनं । ६१४/२०२२ भादविक ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास न लागल्याने
सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU) अहिल्यानगर यांचेकडेस गुन्ह्यास भादवि
कलम ३७० हे वाढीव कलम लावून तपासकामी वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोसई
बाळासाहेब शिंदे हे करीत होते.
वरील नमुद गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष ( AHTU) अहिल्यानगर येथे
वर्ग झाल्यानंतर पो.नि. राजेंद्र इंगळे व शाखेचे अधिकारी/अंमलदार यांनी वेगवेगळ्या मार्गाने व गुप्त
बातमीदारामार्फत माहिती काढुन शोध घेत असतांना अशी माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील अपहरीत
मुलगी ही वेल्हे जि. पुणे येथे असलेबाबत माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पो.नि. राजेंद्र इंगळे यांनी स्टापसह
वेल्हे जि. पुणे येथे जावून स्थानिक पोलीसांच्या मदतीने अपहरीत मुलीचा शोध घेतला असता अपहरीत मुलगी
मिळून आल्याने तिस पुढील तपासकामी कोतवाली पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथे हजर करण्यात आलेले
आहे.
सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला सो., पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, श्री प्रशांत खैरे
सो., अपर पोलीस अधिक्षक अहिल्यानगर, श्री गणेश उगले सो. पोलीस उपअधिक्षक अहिल्यानगर, यांचे
सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे,पोसई/ बाळासाहेब शिंदे, पोहेकॉ/ २०२४ समीर
. मपोहेकॉ १२४६ / अर्चना काळे, मपोहेकाँ/ १०८२ अनिता पवार, मपोकाँ/ १३६५ छाया रांधवन, चालक
पो.कॉ. २६७३/ एस.एस. काळे सर्व नेम – अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष (AHTU) अहिल्यानगर,
यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे