ब्रेकिंग
Trending

सौंदाळा येथील मंदिरातील गणपतीची मूर्ती चोरी करणाऱ्या आरोपीला नेवासा पोलिसांनी केले जेरबंद.

संतोष औताडे – मुख्य संपादक, नेवासा             दिनांक -23/01/2025

सविस्तर माहिती-दि. 3 जानेवारी रोजी झालेल्या गणपती मूर्ती चोरी प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने एकास ताब्यात घेतले आहे.

सौंदळा येथील मंदिरातील दि. 3 जानेवारी रोजी 4000/- रुपये किमतीची गणपती मूर्ती चोरी गेली होती. या चोरी प्रकरणी संजय मोहन आरगडे रा. सौंदाळा यांनी पोलीस ठाणे नेवासा येथे फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी अ-दखलपात्र गुन्हा नोंदवला होता.

मंदिरातील चोरी झाल्यानंतर सौंदळा परिसरातील नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. या तीव्र भावनेची दखल नेवासा पोलिसांनी गांभीर्याने घेऊन नेवासा पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील अंमलदार यांना मूर्ती चोर शोधण्यासाठी कामास लावुन तपासाची चक्री वेगाने फिरवली होती.

मंदिरातील गणपती मूर्ती चोरणाराचा शोध घेण्यासाठी मंदिर परिसरातील व सौंदळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेच्या दिवशी दुपारी 2.30 वा. सुमारास एक संशयित सिटी हंड्रेड मोटर सायकलवर संशयतरित्या जात असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी सदर संशयित मोटर सायकल चालक हा जेथ पर्यंत गेला तिथ पर्यंत मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून संशयता पर्यंत पोहोचले असता तेथे नवनाथ कडू रा. बाभुळखेडा हा इसम मिळून आला. सदर ईसमास चोरी बाबत विचारणा केली असता प्रथमता नाही होऊन पडला परंतु पोलिसांनी पोलिसी खात्याची भीती दाखवताच चोरी प्रकरणी कबुली दिली व चोरलेली गणपतीची मूर्ती देखील काढून दिली.

सौंदाळा येथील गणेश मूर्ती चोरी प्रकरणी ताब्यात घेतलेला ईसम नवनाथ कडू हा मानसिक दृष्ट्या आजारी असल्याचे व त्याच्यावर उपचार असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगीतले.

सौंदळ येथील गणपती मूर्ती चोरी प्रकरणी सौंदाळा वाशियांच्या भावना तीव्र झाल्याने दिनांक 24 जानेवारी रोजी कुकाना पोलीस दूरक्षेत्रा समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. परंतु नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सौंदाळातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गणेशाची मूर्तीचा छडा लावू असा विश्वास दिल्याने ग्रामस्थांनी आयोजित धरणे आंदोलन देखील स्थगित केले होते. दरम्यान मूर्ती चोरीचा छडा लागल्याने सौंदाळा ग्रामस्थ हे समाधानी झाले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याकडील डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अमोल साळवे, नारायण डमाळे सुमित करंजकर अविनाश वैद्य भारत बोडके व अरुण गांगुर्डे यांनी पार पाडली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे