तिसगाव ता.पाथर्डी येथील तरूणाच्या डोक्यात गावठी कट्टयाने फायर करून केलेल्या खुनाच्या गुन्हयातील आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
संतोष औताडे – मुख्य संपादक दिनांक- 07/10/2024 ——————————————————
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 04/11/2024 रोजी प्रवरासंगम ता.नेवासा येथे अनोळखी पुरूषाचा मृतदेह मिळून आला.मृतदेहाचे फोटो सोशल मिडीयावर प्रसारीत करून मृतदेहाची ओळख पटविली असता सदरचा मृतदेह हा कल्याण देविदास मरकड, रा.तिसगाव, ता.पाथर्डी याचा असल्याचे निष्पन्न झाले. मयत हा दि.01/11/2024 रोजी पासुन बेपत्ता असल्याने त्याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे मिसींग क्रमांक 129/2024 अन्वये मिसींग नोंदविण्यात आलेली होती.
प्रवरासंगम, ता.नेवासा येथे सापडलेला अनोळखी पुरूषाचा मृतदेह व पाथर्डी पोलीस स्टेशन येथील मिसींगमधील व्यक्ती एकच असल्याची खात्री झाल्याने दिनांक 05/11/2024 रोजी फिर्यादी श्री.प्रसाद भास्कर मरकड, रा.तिसगाव ता.पाथर्डी हा मयताचा भाऊ असून मयत हा दिनांक 01/11/2024 रोजी पंकज राजेंद्र मगर, वय 35, रा.माधवनगर, तिसगाव, ता.पाथर्डी 2) इरशाद जब्बार शेख, वय 38, रा.सोमठाणे रोड, तिसगाव, ता.पाथर्डी यांना भेटण्यासाठी गेला होता. त्यांच्यावर संशय व्यक्त करून त्यांनीच मयताचे डोक्यात कोणत्या तरी अज्ञात हत्याराने अज्ञात कारणावरून जीवे ठार मारलेबाबत गुन्हा नोंदविला.याबाबत नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. 1029/2024 बीएनएस कलम 103 (1), 238, 3 (5) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हा घडलेबाबत माहिती मिळाल्यानंतर मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/ तुषार धाकराव व पोलीस अंमलदार सुरेश माळी, संदीप पवार, संतोष लोढे, शरद बुधवंत, संतोष खैरे, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, अर्जुन बडे, अरूण मोरे अशांचे पथक नेमुण वर नमुद गुन्ह्याचा आरोपी यांचा शोध घेणेबाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
तपास पथकाने गुन्हयाचे तपासात तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आरोपीचा शोध घेत असताना दिनांक 06/11/2024 रोजी पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गुन्हयातील संशयीत आरोपी नामे पंकज राजेंद्र मगर व इरशाद जब्बार शेख हे निवडुंगे शिवारात असलेबाबत माहिती मिळाली. पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी मिळालेली माहिती तपास पथकास देऊन, माहितीची पडताळणी करून पुढील कारवाई करणेबाबत कळविले.
तपास पथकाने निवडुंगे, ता.पाथर्डी येथे संशयीत इसमांचा शोध घेऊन ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यातील इसमास त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) पंकज राजेंद्र मगर, वय 35, रा.माधवनगर, तिसगाव, ता.पाथर्डी 2) इरशाद जब्बार शेख, वय 38, रा.सोमठाणे रोड, तिसगाव, ता.पाथर्डी 3) अमोल गोरक्ष गारूडकर, वय 33, रा.तिसगाव, ता.पाथर्डी असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता दिनांक 01/11/2024 रोजी रात्री 11.00 वा.सुमारास वर नमूद आरोपी व मयत कल्याण देविदास मरकड असे तिसगाव मधील मिरी रोडच्या भारत पेट्रोलपंपाच्या मागील बाजुस मोकळया जागेत दारू पित असताना मयत व पंकज मगर यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले.वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन पंकज मगर याने त्याचेकडील गावठी कट्टयाने कल्याण मरकड याचे कपाळावर गोळी मारली त्यात तो मयत झाला असल्याचे सांगीतले.त्यानंतर आरोपीतांनी मयताचा मृतदेह, चप्पल व मोबाईल पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने एका गोणीत भरून चारचाकी वाहनातुन प्रवरासंगम येथील ब्रीजवरून खाली पाण्यात टाकुन दिला. तसेच आरोपी पंकज राजेंद्र मगर याने गुन्हयात वापरलेले अग्नीशस्त्र हे सचिन रणसिंग रा.दत्ताचे शिंगवे ता.पाथर्डी याने पुरविले असल्याची माहिती सांगीतली आहे.
ताब्यातील आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.