केंद्रीय राखीव दल (CRPF) व नेवासा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रूटमार्च चे आयोजन.
संतोष औताडे -मुख्य संपादक ,नेवासा. दिनांक- 01/11/2024
सविस्तर माहिती – आगामी काळात निवडणूक प्रक्रिया
शांततेत व निर्भयी वातावरणामध्ये पार
पाडण्यासाठी केंद्रीय राखीव दल (CRPF) व नेवासा पोलीस यांच्या
संयुक्त विद्यमाने रूटमार्च चे आयोजन करण्यात आले होते. जनसामान्यांमध्ये विश्वास
निर्माण करणे व गुन्हेगारांवर वचक निर्माण
करणे यासाठी नेवासा पोलीस ठाण्याच्या
हद्दीमध्ये नेवासा शहर व कुकाणा येथे दि. 31आॅक्टोबर2024 रोजी सकाळी 9.30 वा रूटमार्च चे आयोजन करण्यात आले होते. .आगामी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024
व आगामी सण उत्सव अनुषंगाने कुकाणा
शहर, भेंडा,नेवासा फाटा, नेवासा शहर या
ठिकाणी निवडणूक प्रक्रिया भयमुक्त
वातावरणात व शांततेत पार पाडणे दृष्टीने
सीमा सुरक्षा बल व पोलीस असा संयुक्त
रूट मार्च घेण्यात आला. 09.30 वा.कुकाणा येथे आगमन झाले
*09.30* ते 10.00 रूट मार्चला सुरुवात झाली होती.
*10.30* नेवासा फाटा येथे आगमन
*10.30 ते 10.45* नेवासा फाटा येथे रूट मार्च
*11.00* नेवासा येथे आगमन
*11.30 ते 12.00* नेवासा गावामध्ये रूट मार्च
सदर रूट मार्च करीता केंद्रिय राखीव पोलीस दलाचे पोलिस निरीक्षक तिजोरे साहेब,35 जवान,पोलीस ठाणे नेवासा कडील 6 अधिकारी, 25 अंमलदार,
असे सहभागी झाले होते झाले.
.सदरचा रूट मार्च हा लक्ष वेधून घेणारा
ठरला. सदर रूट मार्चचा सकारात्मक
परिणाम दिसून आला.
सदरचा रूट मार्च मुख्यतः सर्वसामान्य
नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना
व विश्वास निर्माण व्हावा व गुन्हेगारांवर
नियंत्रण राहावे हा होता.
सदरचा रूट मार्च अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश
ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव
कल्लुबर्मे, श्रीरामपूर ,व शेवगाव येथील उप विभागीय पोलीस
अधिकारी सुनील पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव साहेब यांनी आयोजित केला होता.