नेवासा येथे ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद 100 मीटर पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी.
संतोष औताडे – मुख्य संपादक ,नेवासा, दिनांक-27/10/2024
नेवासा येथे ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सीलबंद 100 मीटर पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी . सविस्तर माहिती-
राज्य विधानसभेच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सिल बंद करण्यात आलेल्या आहेत.
आज अहिल्यानगर येथील धान्य गोडाऊन येथून 221 नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी ई.व्ही.एम. मशीन्स आज रोजी पोलिसांच्या सुरक्षेच्या ताफ्यामध्ये नेवासा येथे आणण्यात आल्या. त्या आणल्यानंतर प्राथमिक तपासणी करून स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या असून स्ट्रॉंग रूमच्या शटरला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या सह्यांचे लेबल लावून सील करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या मशीन या 19 नोव्हेंबर पर्यंत सीलबंद राहणार असून त्यानंतर 19 नोव्हेंबरला मशीनचे वाटप करून मतदान केंद्रावरती रवाना केल्या जाणार आहेत.
ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी अहोरात्र केंद्रीय सुरक्षा बल, राज्य राखीव पोलीस बल व जिल्हा पोलिसांची त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे तसेच सीसीटीव्हीची निगराणी देखील ठेवण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव स्ट्रॉंगरुम पासून 100 मीटर अंतरावर नागरिकांना प्रवेश बंदी घातली आहे अशी माहिती नेवासा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब यांनी सांगितले आहे.