हांडी निमगाव ता.नेवासा येथे गावठी कट्टा बाळगणारा इसम जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई.
संतोष औताडे -मुख्य संपादक, दिनांक- :-29/10/2024
——————————————————–
मा.श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये स्थागुशा पथक जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्राबाबत माहिती घेताना दिनांक 28/10/2024 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक इसम बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगत असून सध्या तो हांडी निमगाव, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर येथे असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, संदीप दरंदले, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, व मनोज गोसावी, रमीजराजा आतार, मेघराज कोल्हे नेम. तपास पथक अशांचे पथक तयार करून संशयीताची माहिती घेवुन तो मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
तपास पथकाने दिनांक 28/10/2024 रोजी छ.संभाजीनगर ते अहिल्यानगर रोडवर, शिवशंभो ॲग्रोजवळ, हांडीनिमगाव, ता.नेवासा येथे संशयीत इसमाचा शोध घेऊन, त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सागर निवृत्ती शिंदे, वय 21, रा.सलबतपूर, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 30,000/- रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचे पिस्टल व 500/- रुपये किंमतीचे 1 काडतुस असा एकुण 30,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपी नामे सागर निवृत्ती शिंदे, रा.सलबतपूर, ता.नेवासा याचेविरूध्द नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. 996/2024 आर्म ॲक्ट कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.