विठ्ठल अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. कडून कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त बोनस व मिठाई वाटप कार्यक्रम संपन्न.
संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा. दिनांक – 26/10/2024
सविस्तर माहिती-
नेवासा तालुक्यातील
भेंडा बुद्रुक येथील विठ्ठल अर्बन
को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.पतसंस्थेच्या
वतीने आज दिनांक 26/10/2024 रोजी संस्थेच्या कर्मचारी यांना दिपावली निमित्ताने बोनस व मिठाई वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच बरोबर संस्थेचे सर्व संचालक,
सभासद, ठेवीदार, कर्जदार,
अल्प बचत खातेदार यांना संस्थेच्या वतीने मिठई वाटप करण्यात आले.
पतसंस्थेच्या कार्यालयात
आयोजित केलेल्या मिठाई वाटप
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेबाबा देवस्थान चे हभप कांदे महाराज हे होते.
यावेळी हभप साहेबराव गव्हाणे महाराज हे ही
प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे
संस्थापक कृष्णा गव्हाणे यांनी
प्रास्ताविक केले. सहा वर्षांपूर्वी 18/03/2018 रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 5 लाख रुपयाच्या अगदी कमी भांडवलात
या संस्थेची उभारणी केली होती. यावेळी संस्थेचे 7 संचालक होते. आज रोजी संस्थेला 7 वर्ष पुर्ण झाले असून 2200 सभासदाचा टप्पा पार केला आहे. आज रोजी या विठ्ठल अर्बन ची उलाढाल 4 कोटी रुपयांच्या वर गेली आहे. नुसते व्याज कमावणे हे संस्थेचे उद्दिष्ट नसुन सर्व सभासद,ठेवीदार, कर्जदार यांचा विस्वास संपादन करून सामाजिक कार्यक्रमात हातभार लावणं हे आहे. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने संस्थेचे कामकाज व्यवस्थीत रित्या चालू आहे.
पतसंस्थेचा कारभार पारदर्शक
असून एक कर्ज थकीत नाही.
त्यामुळे सर्व खातेदार, ठेवीदार व
कर्जदार यांना योग्य पद्धतीने सेवा
देण्याचे काम विठ्ठल अर्बन करिता आहे.. यासाठी मला संस्थेचे
सर्व पदाधिकारी व कर्मचारी वृंद
यांचे मोलाचे सहकार्य मिळत
असल्याचे अध्यक्ष कृष्णा गव्हाणे यांनी सांगितले.
प्रयत्न संस्था करत आहेत.
तसेच कर्मचाऱ्यांना बोनस
देण्यात आला, असे कृष्णा गव्हाणे यांनी सांगितले. यावेळी
संस्थेचे चेअरमन सुनिता कृष्णा
गव्हाणे, संचालक राजेंद्र दुधाडे, नितीन मेहञे,
संजय गव्हाणे, प्रविण उंडे, गणेश मुळे(पञकार) सोनवणे( पञकार)
दत्तु आघाव, संतोष औताडे (पञकार)
चंद्रकांत साबळे, हौशीराम नवले, डॉ.आलेऀ, प्रविण उंडे, साबळे मॅडम, निकम मॅडम, सोमनाथ भोसले, मोहनराव पाटील, अरूण फोलाने, उत्तम देव्हडे, कृष्णा आरगडे,
, संदिप
जावळे, आशा जावळे, उषा गव्हाणे , भुसारी साहेब, तसेच मॅनेजर सुरेश
दरवडे, क्लार्क शुभम आढागळे,
कॅशियर रुपाली चौधरी मॅडम,कृष्णा मंडलिक, दैनिक
अल्प बचत प्रतिनिधी बाळासाहेब
तागड, महेश गव्हाणे, प्रविण उंडे यांच्यासह
खातेदार , संचालक , ठेवीदार कर्जदार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेचे
मॅनेजर सुरेश दरवडे यांनी उपस्थितांचे
आभार मानले.