गुन्हेगारी
Trending

अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणा-या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी केले जेरबंद.

संतोष औताडे -मुख्य संपादक,                      दिनांक -24/10/2024


सविस्तर माहिती- दि. 23/10/2024 रोजी कॅम्प पोलीस स्टेशन, भिंगारचे सहा. पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर
यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक ईसम एल.आय.सी. ऑफिसच्या पाठिमागे असणारे पंडित नेहरु
विद्यालयाजवळ गावठी कट्टा अवैधरित्या घेऊन फिरत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर
माहिती प्राप्त झाल्याने सहा पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर यांनी तात्काळ भिंगार कॅम्प पोलीस
स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांना बातमीतील नमुद ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई
करणेबाबत आदेशीत केल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील
नमुद ठिकाणी जाऊन सापळा लावला असता एक इसम एल.आय.सी. ऑफिसकडुन पंडित नेहरु
विद्यालयाचे गेटजवळ अंधारात येताना दिसला. सदर इसमास पोलीस आल्याची चाहुल लागताच तो पळुन
गेला असता त्याचा पोलीस तपास पथकातील अंमलदारांनी पाठलाग करुन त्याचेवर झडप घालुन पकडुन
त्याची झडती घेतली असता त्याचे पँटचे खिशात एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसे पंचासमक्ष
ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रकाश विठ्ठल मोरे, वय 20 वर्षे, रा.
निंबोडी, ता.जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितल्याने सदर इसमाविरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा
रजि नं. 746/2024 भारतीय शस्त्र कायदा कलम 3, 25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला सो., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.
प्रशांत खैरे सो., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग श्री. अमोल भारती सो., यांचे
मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक श्री. जगदीश मुलगीर, पोलीस उपनिरिक्षक योगेश शिंदे, चंद्रकांत
माळोदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपक शिंदे, रवि टकले, संदिप घोडके, इस्त्राईल पठाण व पो.कॉ. समीर
शेख, प्रमोद लहारे, वैभव झिने यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे