गुन्हेगारी
Trending

पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद टोळीकडून तिसगाव, ता.पाथर्डी येथील वृध्दाचे खुनासह इतर 14 ( दरोडा, जबरी चोरी व घरफोडी ) गुन्हे उघडकीस

संतोष औताडे- मुख्य संपादक.                                 दिनांक -11/09/2024

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. बाळासाहेब मच्छिंद्र ससाणे, रा.तिसगाव ता.पाथर्डी यांचे वडील मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे हे त्यांचे राहते घरी झोपलेले असताना अज्ञात आरोपीतांनी त्यांच्या गोठयातील शेळया व कोंबडया चोरी करीत असताना मयत मच्छिंद्र ससाणे त्यांनी आरोपीस प्रतिकार केला. म्हणुन अनोळखी आरोपींनी मयताचे डोक्यात काहीतरी धारदार हत्याराने मारहाण करून जीवे ठार मारले बाबत पाथर्डी पो.स्टे. गुरनं 844/2024 भा.न्या.सं. 2023 चे कलम 103 (1), 309 (6), 331 (8), 127 (2) खुनासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर ना उघड खुनासह जबरी चोरीचे गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन, गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार राम माळी, विश्वास बेरड, संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, पंकज व्यवहारे, शरद बुधवंत, संदीप दरंदले, संतोष खैरे, राहुल सोळुंके, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, मयुर गायकवाड, उमाकांत गावडे, महादेव भांड अशांचे तीन पथके नेमुन वर नमुद गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

वरील पथकांनी घटनाठिकाणी भेट देवुन, साक्षीदाराकडे विचारपुस करून आरोपी हे मोटार सायकलवरून आल्याचे निष्पन्न केले.त्यानंतर तपास पथकाने घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करून, तिसगाव पासुन अहमदनगर, मिरी, शेवगाव व पाथर्डी अशा रोडच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच घटना घडलेल्या वेळीपासुन तांत्रीक विश्लेषण करून 3 मोटार सायकलवरून 10 आरोपी तिसगाव पाथर्डी रोडने गेल्याचे तपासात निष्पन्न केले.

सीसीटीव्ही फुटेजमधील संशयीत इसमांचे फोटो गुप्त बातमीदारांना पाठवून गुन्हा करणाऱ्या आरोपींची ओळख पटविण्यात आली होती. ओळख पटविण्यात आलेल्या आरोपींचा शोध घेत असताना पोनि/ दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदाराकडुन गुन्हयातील आरोपी हे वाकळे वस्ती, माळीबाभुळगाव परिसरात आहेत, अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आरोपी ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्या.त्यानुसार पथकाने वाकळे वस्ती येथे जाऊन खात्री करता एका पालाजवळ 8 ते 10 इसम बसलेले दिसले. पोलीस पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी जात असताना संशयीत इसम पोलीस पथकास पाहुन पळून जाऊ लागले. पथकाने त्यापैकी 6 इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) उमेश रोशन भोसले, रा.साकेगाव, ता.पाथर्डी, वय 26, रा.साकेगाव, ता.पाथर्डी 2) दौलत शुकनाश्या काळे, वय 25, रा.माळीबाभुळगाव, ता.पाथर्डी 3) सिसम वैभव काळे, रा.माळीबाभुळगाव, ता.पाथर्डी 4) शिवाजी रोशन उर्फ शेरू भोसले, रा.साकेगाव, ता.पाथर्डी 5) आकाश उर्फ फय्याज शेरू उर्फ लोल्या काळे, रा.बाभुळगाव, ता.पाथर्डी 6) विधी संघर्षित बालक, वय 14 वर्षे असे सांगीतले. त्यांचेकडे वर नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार 7) सेशन उर्फ बल्लु रायभाण भोसले, रा.साकेगाव, ता.पाथर्डी (फरार) 8) बेऱ्या रायभान भोसले, रा.साकेगाव, ता.पाथर्डी (फरार) 9) आज्या उर्फ बेडरुल सुरेश भोसले, रा. टाकळीफाटा, ता.पाथर्डी (फरार) 10) लोल्या उर्फ शेरू सुकनाश्या काळे, रा.माळी बाभुळगाव, ता.पाथर्डी, (फरार) यांचेसह गुन्हा केल्याचे सांगीतले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपींना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी तसेच इतर साथीदार हे मोटार सायकलवर जाऊन एकांतातली वस्ती पाहुन व शेजारील घरांना कडया लावून ज्या घरात वयस्कर लोक झोपलेले असतील प्रथम त्यांना मारहाण करून त्यांचे जवळील दागीने हिसकावून घेत असलेबाबत माहिती दिली. तसेच घटनेच्या वेळी ते सर्व मोबाईल बंद करत असल्याने तपासात अडचणी येत होत्या.अशा प्रकारे त्यांनी शेतामधील असणाऱ्या वस्तीचे घराचे दरवाजा तोडून, रस्ता आडवून शेवगांव तालुक्यातील बोधेगांव, घोटण, शेकटे या ठिकाणी, पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, चांदगांव, जांभळी, शेकटे, दुलेचांदगांव, महिंदा, तिसगांव, सुसरे या ठिकाणी तसेच मिरजगांव, ता. कर्जत, व मातोरी, ता. शिरुर कासार, जि. बीड येथील खालील प्रमाणे मालाविरूध्दचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने एकुण 15 गुन्हे उघडकिस आलेले आहेत ते खालील प्रमाणे –

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 पाथर्डी 844/2024 बीएनएस 103 (1), 309 (6)
2 पाथर्डी 795/2024 बीएनएस 309 (6)
3 पाथर्डी 771/2024 बीएनएस 305 (अ)
4 पाथर्डी 681/2024 बीएनएस 331 (4), 305 (अ)
5 पाथर्डी 760/2024 बीएनएस 305 (अ)
6 पाथर्डी 580/2024 भादंविक 457, 380
7 पाथर्डी 513/2024 भादंविक 379
8 पाथर्डी 103/2024 भादंविक 394, 511
9 पाथर्डी 450/2024 भादंविक 392,34
10 पाथर्डी 464/2024 भादंविक 394, 34
11 शेवगाव 694/2024 बीएनएस 309 (6), 127 (2)
12 शेवगाव 603/2024 बीएनएस 309 (6), 127 (2)
13 शेवगाव 695/2024 बीएनएस 309 (6), 3 (5)
14 मिरजगाव 214/2024 बीएनएस 331 (4), 305 (अ)
15 चकलांबा जि.बीड 227/2024 बीएनएस 331 (4), 305 (अ)

ताब्यातील आरोपींना पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. 844/2024 भा.न्या.सं.कलम 103 (1), 309 (6), 331 (8), 127 (2) या गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्याचेवर यापुर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी नामे नामदेव उमेश रोशन भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खुन, दरोडा, जबरी चोरीचे असे गंभीर स्वरुपाचे 6 गुन्हे, सिसम वैभव काळे याचेवर दरोडयाचे 3 गुन्हे, दौलत शुकनाश्या काळे यांचेवर घरफोडीचे 3 गुन्हे, लोल्या उर्फ शेरू सुकनाश्या काळे याचेवर दरोडयाचे 4 गुन्हे व बेऱ्या उर्फ किशोर रायभान भोसले याचेवर दरोडा व जबरी चोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री.प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे