
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा, दिनांक -19/09/2024
नेवासा शहरात पोलिसांकडून सरप्राईज नाकाबंदी दोन तासात तपासली 750 वहानेसविस्तर माहिती– नेवासा शहरात वाढत्या चो-या आणि गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी गुरवारी दिनांक 19/09/2024 रोजी दुपारी 4 वाजता अचानक सरप्राईज नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी करून नेवासा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब यांनी गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा घालण्याचा प्रयत्न केला. शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांकडून काही आरोपींचा शोध सुरू आहे. नेवासा शहरात मोठी घटना घडल्यास नाकाबंदी केली जाते. मात्र आज अचानक नाकाबंदी करून गुन्हेगार सापडतील किंवा संशयित ताब्यात घेता येतील काय याची चाचपणी नेवासा पोलिसांनी केली. अनेक चौकात वाहनांची तपासणी करण्यात आली. काही दुचाकी वाहनांवर क्रमांक नव्हते, तर काही वाहनचालकां जवळ कागदपत्र नव्हते.
या नाकाबंदीत पोलिसांनी दोन तासात 750 दु चाकी वाहने व चार चाकी वाहने तपासली तसेच काहींना जणांना चौकशी करून सोडण्यात आले.या नाकाबंदीतमधे 3 अधिकारी, 16 पोलिस अंमलदार, 30 होमगार्ड सहभागी झाले होते . पोलिस निरीक्षक धनंजय जाधव साहेब या नाकाबंदीत रस्त्यावर उतरले होते.

विचित्र नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांना पोलिसांनी कडक तंबी दिली. तर ट्रिपल सीट जाणा-या वाहनधारकांना समज देऊन सोडण्यात आले. या कारवाईमुळे वाहनधारकां ची काही वेळ तारांबळ उडाली होती. यापुढील काळातही अशीच कारवाई केली जाईल असे नेवासा पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.