राहुरी पोलीस स्टेशन येथे पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान तसेच सेवानिवृत्त झालेले अधिकारी यांचा निरोप समारंभ संपन्न.
संतोष औताडे- मुख्य संपादक,नेवासा. दिनांक- 6/8/2024
राहुरी पोलीस स्टेशन येथे पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान तसेच सेवानिवृत्त झालेले अधिकारी यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
राहुरी पोलीस स्टेशन येथील श्री देवेंद्र सूर्यकांत शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना नुकतीच शासनाकडून पदोन्नती देण्यात आली आहे त्यांची पोलीस निरीक्षक नंदुरबार जात पडताळणी समिती येथे नेमणूक झाल्याने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, तसेच राहुरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोऊप निरी पोपटराव कटारे ,सफौ.जाधव म्हातारदेव जाधव नियमित वयोमानाने सेवानिवृत्त झाल्याने त्यांनाही निरोप समारंभ देण्यात आला , श्री चंद्रकांत बराटे, यांची पोलीस उपनिरीक्षक पदी तसेच अभिजीत पोपटराव कटारे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने त्यांचाही सत्कार समारंभ ठेवण्यात .
आला सदर कार्यक्रमाकरिता डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, संजय ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, रवींद्र पिंगळे, संदीप परदेशी ,धर्मराज पाटील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत खोडे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस उप निरीक्षक असे हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन बोडके पोलीस उपनिरीक्षक यांनी केले सदर कार्यक्रमाकरिता 30ते 40पोलीस अंमलदार अधिकारी उपस्थित होते.