ब्रेकिंग
Trending

राहुरी येथील वकील आढाव दांपत्य दुहेरी हत्याकांडातील आरोपींची नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी

संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा.    दिनांक -22/07/2024

राहुरी पोलीस स्टेशन गुरंनं.७५/२०२४ सत्र न्यायालय
खटला क्रमांक. १२६/२०२४ मधील आरोपी नं. १ किरण नानाभाऊ दुȋशग आरोपी नं. २. भैया उर्फ सागर साहेबराव खांदे आरोपी नं. ३. शुभम संजीत महाडीक आरोपी नं. ५. बबन सुनील मोरे यांना अहमदनगर माननीय सरकारी वकील सो श्री उज्वल निकम यांच्या प्रयत्नाने माननीय न्यायालयाने जिल्हा बाहेर वर्ग करण्याची राहुरी पोलीस व जेल अधीक्षक राहुरी यांनी केलेली विनंती नुसार जिल्हा बाहेर वर्ग करण्याची परवानगी दिल्याने नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने सदर चारही आरोपींना राहुरी पोलिसांनी नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे आज रोजी जमा केले आहे. तसेच आरोपी क्रमांक चार हर्षल ढोकणे हा माफीचा साक्षीदार झाल्याने माननीय न्यायालयाने त्यास राहुरी सब जेल येथेच ठेवण्याचे आदेशित केले आहे.
सदरची कारवाई माननीय न्यायालयाच्या आदेशाने व पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलूबर्मे, पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे,पोलीस हेडकॉन्स्टेबल 2212/ बाळासाहेब महंडुळे, पोलीस नाईक 561/ संभाजी बडे, पोलीस नाईक 1010/ उत्तरेश्वर मोराळे पोलीस कॉन्स्टेबल 2648 अंबादास गीते, पोलीस कॉन्स्टेबल 786/ इफतेखार सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल 1670 प्रतीक आहेर यांनी पार पाडले आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे