
संतोष औताडे- मुख्य संपादक,नेवासा- दिनांक – 31/01/2024
तरवडी गावात कृषी कन्यांनी केला प्रजासत्ताक दिन साजरा.
सविस्तर माहिती-महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविदयालय भानसहिवरे महाविद्यालयातील कृषी कन्या यांनी जि.प.प्राथ. शाळा. तरवडी या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा केला.
या प्रसंगी सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी,पालक, सदस्य समवेत ध्वजारोहण करून राब्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. हा दिवस सर्व भारतीयांसाठी फार महत्त्वाचा आहे.
आपली लोकशाही राज्यघटना २६ जाने. १९५० रोजी अमलात आली म्हणून हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
यावेळी कृषी महाविदयालय भानस हिवरे येथील प्राचार्य डॉ. प्रकाश तुरबटमठ, कार्यक्रम साहाय्यक एम. आर माने यांचे मार्गदर्शन लाभले.