आरोग्य व शिक्षण
Trending

नैसर्गिक संसाधने नष्ट होणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज-जलमित्र सुखदेव फुलारी

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा.         दिनांक -31/01/2024

(सविस्तर माहिती ):– नवनिर्मिती करतांना कच्च्या मालाचे स्वरुपात नैसर्गिक संसाधनांचा शोषण
होत आहे.एकाचे अस्तित्व नष्ट करून
दुसऱ्याची निर्मिती होत असते.नवनिर्मिती आवश्यक असली तरीही नैसर्गिक संसाधने पूर्ण नष्ट होणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय व
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नजिक चिंचोली येथे श्री.खड़ेश्वरी देवी मंदिर परिसरात आयोजित
विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबीरात
श्री.फुलारी यांचे “जलसंधारण आणि महाविद्यालयीन युवकांचा सहभाग” याविषयावर व्याख्यान झाले,त्यावेळी ते बोलत होते.प्रा.योगेश लबडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा विभाग समन्वयक प्रा.डॉ. संजय महेर,कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. अब्दुललतिफ शेख,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. मोहिनी साठे,मदतनिस रमेश भालेकर,पत्रकार संतोष औताडे,युवराज सातपुते आदि यावेळी उपस्थित होते.

श्री.फुलारी पुढे म्हणाले,मानवाला जगण्यासाठी जमीन,पाणी व हवा या संसाधनांची नितांत गरज आहे.
अन्न-धान्य निर्मिती व पाण्याची उपलब्धता जमीनीतुनच होते.
अन्नाशिवाय मानव १५ दिवस जगू शकतो परंतु पाण्याशिवाय ५ दिवस ही तग धरू शकणार नाही. हवेतील प्राणवायू
शिवाय आपण मिनिटभर ही जगु शकणार नाही.पाणी हेच जीवन आहे,पाणी हाच निर्मितीचा मूळ घटक आहे. माणसाचं,पशु-पक्षांचं जीवन,शेती-उद्योग सर्व काही पाण्याच्या उपलब्धतेवरच अवलंबून आहे.जलसंधारणाच्या माध्यमातून पावसाचे शक्य तितके पाणी जमिनीत जिरवा,साठवून ठेऊन त्याचा गरजे प्रमाणे वापरा करावा.इमारतींच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविले तर पुढचे सहा महिने तेच पाणी कूपनलिका-विहिरीतून वापरता येईल.
जमिनीतील सुपिक मातीचा थर तयार होण्यास अनेक वर्षाचा कालावधी लागतो.
सुपिक माती वाहून जाऊ नये याकरिता मृद संधारणाचे काम करावे.मुबलक प्राणवायु मिळावा यासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन याकडे ही लक्ष दिले पाहिजे.झाडेच आपल्याला प्राणवायू देते,जमिनीची धूप थांबवते आणि पाण्याचे रिसायकलिंग ही करते.महाविद्यालयीन युवक-युवतींनी मृद-जलसंधारण व वृक्ष संवर्धन कार्यात आपले योगदान द्यावे.
प्रा.विकास कसबे यांचे “लोकसंख्या नियंत्रण काळाजी गरज” या विषयावर व्याख्यान झाले.प्रा.लबडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थीनी पल्लवी शिरसाट येणे व्याख्यात्यांचा परिचय करून दिला.
पूनम म्हस्के हिने सूत्रसंचालन केले.
प्रियंका ताके हिने आभार मानले.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे