
संतोष औताडे-मुख्य संपादक, . . नेवासा ,दिनांक- 05/02/2024
गावठी कट्टे बाळगुन जनतेत भीती, दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.-
धनंजय जाधव. पोलिस निरीक्षक, नेवासा
सविस्तर माहिती –
नेवासा पोलीस स्टेशन हददीत मौजे कुकाणा ते देवगांव रोडवर दिनांक २६/१/२०२४ रोजी सकाळी
११/०० वा चे सुमारास चार अज्ञात इसमानी साक्षीदार नामे जगदीश ध्रुव यास लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने
मारहान करुन व गावठी कटटयाचा धाक दाखवुन त्याचे खिशातील रोख रक्कम व मोबाईल बळजबरीने
हिसकावुन घेवुन त्याचेकडील स्वीफट गाडी नं एम एच १५ ई बी ८००८ ही मधुन पसार झाले होते सदर बाबत
नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा रजि नं ६४/२०२४ भा.द.वि.क.४४९,४५०,३२७,५०४,५०६,३४, आर्म अॅक्ट
३(२५) सह मु पो का क ३७ (१)
(३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयांचा पुढील तपास पोसई
मनोज अहिरे हे करत आहेत.
सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेता मा पोलीस अधीक्षक, श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस
अधीक्षक, श्रीमती स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री सुनिल पाटील साहेब यांनी पोलीस
निरीक्षक श्री धनंजय जाधव यांना सदरचा गुन्हयातील आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत सुचना देवुन
मार्गदर्शन केले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री धनजंय जाधव सो यांनी तात्काळ पोसई मनोज अहिरे व
पोसई विजय भोंबे व पोलीस अंमलदार पो ना खेडकर, पो कॉ एन डमाळे, पो कॉ साळवे, पो कॉ राहुल
गायकवाड, पो कॉ खंडागळे, चापोकॉ म्हसमाळे, चापोकॉ बर्डे यांचे दोन तपास पथके तयार करून पुढील तपास
चालु केला असता मा पोलीस निरीक्षक नेवासा पोलीस स्टेशन यांना गोपणीय बातमी दारामार्फत माहिती
मिळाली की, सदर गुन्हयांतील आरोपी पैकी हातामध्ये गावठी कटटा घेवुन दहशत करणारा आरोपीचे नाव
सचिन रमेश पन्हाळे रा खालची वेस, भगतसिंग चौक, शेवगांव येथील असल्याचे माहिती मिळाल्याने मा पोलीस
निरीक्षक श्री भदाने सो, पोसई निरज बोकील, पो कॉ शाम गुंजाळ, पोसई मनोज अहिरे, पोसई विजय भोंबे, पो ना
खेडकर, चापोकॉ बर्डे यांनी संयुक्तरित्या नमुद आरोपीस शेवगांव मधुन ताब्यात घेवुन चौकशी केली असता
आरोपी नामे सचिन रमेश पन्हाळे रा खालची वेस, शेवगांव याने गुन्हयांची कबुली देवुन त्याचे सोबत गुन्हा
करतेवेळी असलेले इतर साथीदार यांचे नाव, पत्ता सांगितले त्यामध्ये आरोपी नामे गौतम दिलिप
म्हस्के, ऋषिकेश दत्तात्रय थावरे व अल्पवयीन बालक हे निष्पन्न झाल्याने आरोपी
गौतम दिलिप म्हस्के, ऋषिकेश दत्तात्रय थावरे यांना सदर गुन्हयांचे तपासकामी नेवासा पोलीस स्टेशन येथे
अटक करण्यात आली असुन एक अल्पवयीन बालक यास पालकाच्या ताब्यात ताबा पावती करुन देण्यात
आले आहे.
६
सदर गुन्हयांचा सखोल तपास केला असता आरोपी क्र १ सचिन रमेश पन्हाळे यांचेकडुन गुन्हा
करतेवेळी त्याने वापरलेला गावठी कटटा व गुन्हयामध्ये वापरलेली स्वीफट गाडी नं एम एच १५ ई बी ८००८
ही जप्त करण्यात आली असुन सदर गुन्हयांचा पुढील अधिकचा तपास चालु आहे.
सदरची कामगिरी ही मा पोलीस अधीक्षक, श्री राकेश ओला साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीमती
स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री सुनिल पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा
पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री धनजंय जाधव साहेब, पोसई मनोज अहिरे, पोसई विजय भोंबे, पो ना
टी बी खेडकर, पो कॉ एन डमाळे, पो कॉ साळवे, पो कॉ राहुल गायकवाड, पो कॉ खंडागळे, चापोकॉ
म्हसमाळे, चापोकॉ बर्डे, शेवगांव पो स्टे पोलीस निरीक्षक श्री भदाणे साहेब, पोसई बोकील, पो कॉ गुंजाळ यांनी
केलेली आहे. सदर गुन्हांचा पुढील अधिकचा तपास पोसई मनोज अहिरे हे करत आहेत.