संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा, दिनांक -02/11/2023
भेंडा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाची सुरुवात सविस्तर माहिती –नेवासा तालुक्यातील भेंडा येथे
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ व पाठिंब्यासाठी आज दिनांक 01/11/2023 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून या उपोषणास सुरुवात करण्यात आली. या साखळी उपोषणास विविध जाती धर्माच्या समाज बांधवांनी, राजकीय नेते, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला. मा.मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता.तरी देखील सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा कोणताही निर्णय घेतला नाही. या मुळे सर्व मराठा समाजाने मा.मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी सगळीकडे गावोगावी साखळी उपोषणाची सुरुवात केली आहे.
शिवरायांनी आठरा पगड जातीतील मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती हीच… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची ही साक्ष आहे.!! हि शिकवण लक्षात घेऊन शांततेच्या मार्गाने भेंडा येथे साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली आहे.
आम्ही सारे एक आहोत. एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देण्यात आल्या. राजकीय दुकानदारी मांडून बसलेल्या काही स्वार्थी राजकीय नेत्यांची यामुळे चांगलीच कोंडी झालेली दिसुन येत आहे.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात अशीच साथ सोबत असू द्या..
असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.