संपादकीय
Trending

भेंडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचा प्रवेश सोहळा व पालक मेळावा संपन्न


संतोष औताडे -मुख्य संपादक, नेवासा दिनांक -03/07/2023


जि.प.प्राथ शाळा भेंडा बु|| येथे बालदिंडी सोहळा व इयत्ता पहिली प्रवेशोत्सव सोहळा टप्पा क्रमांक दोन, तसेच पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . जिल्हा परिषद शाळेत बालदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

 पूर्ण गावात दिंडीचे सडा रांगोळी करून स्वागत केले.स्रियांनी पालखीचे  औक्षण करून पूजा केली. जिल्हा परिषद शाळेची दिंडी गावठाण मार्गे ग्रामपंचायतीसमोर येऊन भक्ती रिंगण झाले.  या ठिकाणी भक्त गणांच्या सुंदर असा  फुगडी कार्यक्रम या ठिकाणी झाला.व दिंडी समाप्ती नागेबाबा मंदिरामध्ये झाली.शाळेतील दोन्ही शिक्षकांचा नागेबाबा देवस्थान तर्फे विशेष असा सन्मान करण्यात आला*.

त्याचप्रमाणे भेंडा बु|| शाळेमध्ये इयत्ता पहिली प्रवेशोत्सव टप्पा क्रमांक दोन साजरा करण्यात आला.व छोट्याशा सभेचे नियोजन करण्यात आले.सभेचे अध्यक्षस्थान भेंडा बु|| गावच्या सरपंच सौ उषाताई मिसाळ यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणून भेंडा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पावलस गोर्डे हे लाभले.गोर्डे सर यांनी आपल्या  भेंडा बु|| शाळेची गुणवत्ता तर उत्कृष्ट आहेच तसेच शाळेत विविध उपक्रम घेतले जातात.यामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मनोगत व्यक्त  केले.*

भेंडा बु|| गावच्या सरपंच डॉ.सौ उषाताई मिसाळ यांनी शाळेची गुणवत्ता तसेच विविध उपक्रमातून  शाळेविषयी आवड निर्माण होते असे मनोगत व्यक्त केले तसेच शाळेसाठी ग्रामपंचायतीमार्फत कमान देण्याचे जाहीर केले.

कार्यक्रमासाठी मोठया संख्येत माता भगिनी, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

श्री अमित सातपुते यांनी शाळेसाठी संगणक तसेच वर्गखोल्यांना रंगकामासाठी लागणारी रक्कम देण्याचे जाहीर केले.

 श्री कृष्णा भाऊ गव्हाणे यांनी शाळेसाठी कपाट देण्याचे जाहीर केले

तसेच श्री सतीश शिंदे यांनी शाळेसाठी महापुरुषांच्या दोन प्रतिमा भेट म्हणून दिल्या.

 

*श्री संतोष गव्हाणे, श्री अरुणभाऊ गोर्डे, श्री कृष्णा भाऊ गव्हाणे तसेच श्री अशोक भाऊ साळवे यांनी डाळ -बट्टी,शिरा व मटकी असे सुंदर असे भोजन शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच सर्व उपस्थित ग्रामस्थांसाठी दिले.

सुंदर अशा  कार्यक्रमाचे आभार श्रीमती यादव मॅडम यांनी मानले.जिल्हा परिषद शाळेत बालदिंडी सोहळ्यासाठी भेंडा बु|| गावच्या सरपंच डॉ. सौ. उषाताई मिसाळ, डॉ श्री लहानु मिसाळ, उपसरपंच सौ मंगल ताई  गोर्डे, श्री अरुण गोर्डे, पत्रकार श्री संतोष औताडे, तलाठी श्री सुभाष भाऊ महाशिकारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अशोक भाऊ साळवे, उपाध्यक्ष श्री राजाभाऊ गोर्डे,शिक्षणतज्ञ श्री कृष्णा भाऊ गव्हाणे, सदस्य श्री संतोष गव्हाणे,श्री बाळासाहेब साळवे,मोईन शेख, सदस्या सौ रोहिणी रवींद्र फुलारी, सदस्या सौ रजिया सय्यद,दिंडी यशस्वी करण्यासाठी वारकरी ह. भ.प  गव्हाणे महाराज, नवले साहेब,सोमनाथ करांडे, शिवदास पवार,सुभाष टेलर,कोळगे मामा, नागेबाबा देवस्थान ट्रस्टचे अशोक मामा गव्हाणे, पुजारी श्री विलास शिरोळे, यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाची सांगता उत्कृष्ट असे भोजन करून झाली. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक मुख्याध्यापक गायकवाड सर यांनी केले 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे