आरोग्य व शिक्षण
Trending

शिक्षकांनी ठरवलं तर एक आदर्श पीढी निर्माण होऊ शकते – गुरूवर्य प्रकाशानंदगिरीजी महाराज

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक -21/06/2023


शिक्षकांनी ठरवलं तर एक आदर्श पीढी निर्माण होऊ शकते – गुरूवर्य प्रकाशानंदगिरीजी महाराज.


नेवासा तालुक्यातील भेंडा येथील *जिजामाता खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्ञानेश्वर नगर येथे श्री कारभारी धोंडीराम पेहरे सर यांचा सेवापुर्ती सोहळा तसेच प्रशिक्षणार्थी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता*. या वेळी देवगड संस्थान चे गुरूवर्य प्रकाशानंदगिरीजी महाराज बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्वस्त् काकासाहेब शिंदे हे होते.पेहरे सर यांनी वयाची 33 वर्ष सेवा केली.डिप्लोमा धारक असलेले पेहरे सर एक आदर्श व शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आहेत.वायरमन व इलेक्ट्रिशियन हे महत्त्वाचे विषय होते. प्रस्तावना देतांना प्राचार्य देशमुख सर यांनी सांगितले की जिजामाता औ.प्र. संस्था, भेंडे व शेवगाव युनिट
भेंडे यूनिट – 7 ट्रेड 16 यूनिट
शेवगाव युनिट – उड्रेड 06 युनिट
‘फी परतावा योजना’ – मागील 3 वर्षापासुन
२ वर्ष उच्या प्रशि ना इ.12 वी परीक्षा देता येते
प्रशिना दरवर्षी ‘150 तासांचे ‘ on Job Trainina
साठी अहमदनगर, छ. संभाजीनगर येथे पाठवले आहे.
प्रशि. ना प्रात्यसिक साठी आवश्यक यंत्रसामग्री
व मटेरियलची उपलब्धता.
वेळोवेळी नवनवीन उपक्रम राबवले जातात.आपल्या जीवनात आध्यात्मिक ज्ञान फार महत्त्वाचे आहे.तुमचे काम प्रामाणिकपणे करा .ते करत असताना समाजाची सेवा केली पाहिजे.आपल्या जीवनात सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक ज्ञान हे आपले जीवन घडवते.सर्व सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा शिकला पाहिजे या तत्वावर सहकारी साखर कारखाना लोकनेते मारूतरावजी घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आला होता.असेही प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी सांगितले.शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नातं खुप वेगळे आहे.शिक्षकांनी ठरवले तर एक आदर्श पीढी निर्माण होऊ शकते.विद्यार्थींनी नोकरी करत असतांना सामाजिक भान जपले पाहिजे. आयुष्यात चांगले मित्र ठेवा . जीवनात संगत चांगली ठेवा, निर्व्यसनी रहा, आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केले तर यश हमखास मिळते असेही महाराजांनी सांगितले.या या सेवापुर्ती सोहळ्यासाठी भारत वाबळे सर, मडके के डी सर,लोढे सर,गुजर सर, संजय वाबळे सर, गादे सर, पञकार संतोष औताडे,सचिन भोसले सर, निंबाळकर सर,शेख सर, मते सर, मडके सर,पञकार गरड सर, देव्हढे सर, आव्हाड सर, कळमकर सर,उगले सर,मस्के सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार लोढे सर यांनी मानले.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे