
संतोष औताडे- मुख्य संपादक, दिनांक 20/06/2023
मोटारसायकल चोरीतील आरोपी मुददेमाला सह अटक राहुरी
पोलीस स्टेशनची कारवाई
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, मा. श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी राहुरी पोलीस
स्टेशन हददीत चोरी झालेल्या मोटार सायकल व मोटार सायकल चोरीस आळा बसावा यासाठी विशेष पथक स्थापन
करुन आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने मा.पोलीस अधिक्षक सो. राकेश ओला साहेब
यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे श्री रामचंद्र कर्पे सहा पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन यांनी राहुरी पोलीस स्टेशन
हददीमध्ये वेळोवेळी नाकाबंदी व गस्त घालुन संशयित आरोपी चेक करुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
राहुरी पोलीस स्टेशन हददीमध्ये संशयित आरोपी व ईसम दिसल्यास राहुरी पोलीस स्टेशनला तात्काळ संपर्क करणे
बाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते.
दिनांक 19/06/2023 रोजी सहा पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना बातमी मिळाली कि मुलनमाथा येथे
दोन आरोपी मोटार सायकल सह संशयित रित्या फिरत आहेत. सहा पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे पोना/ राजेंद्र
नागरगोजे, पोकॉ/ सचिन ताजने, पोकॉ/ आजिनाथ पाखरे, पोकॉ/ प्रमोद ढाकणे, पोकॉ/ गावर्धन कदम, पोकॉ/ नदिम
शेख, पोकॉ/ रोहित पालवे, पोकॉ/सचिन बर्डे, पोकॉ/ भाऊसाहेब शिरसाठ, चापोकॉ/ लक्ष्मण खेडकर यांनी अशांनी
मुलनमाथा परिसरात सापळा लावुन आरोपी नामे 1) साईनाथ शिवाजी देशमुख वय 5 रा. मल्हारवाडी ता. राहुरी 2) मुंभा
भगवान शिंदे वय. 19 रा. मुलनमाथा ता. राहुरी 3) जावेद बशिर सय्द वय. 30 रा. मुलनमाथा ता. राहुरी यांना त्यांचेकडे
असलेले मोटार सायकल सह ताब्यात घेवुन त्यांना पोलीस स्टेशनला आणले असता त्यांचेकडे विचारपुस केली असता
त्यांनी राहुरी पोलीस स्टेशन गुरनं 670/2023 भादवि कलम 379 तसेच त्यांचेकडे चोरीच्या असलेल्या 14 वेगवेगळ्या
कंपनिच्या मोटार सायकली काढुन दिल्या आहेत.
आरोपी कडुन खालील प्रमाणे मोटार सायकली हस्तगत केल्या आहेत
चेसी नंबर
अ.क्र गाडीचे नाव व रंग
बजाज प्लॅटीना काळया रंगाची
हिरो स्पेल्डंर काळया निळया रंगाची
स्प्लेंडर
हिरो स्पेल्डंर काळी पांढरी
बजाज डिस्कव्हर काळी लाल
होंडा शाईन लाल पांढरीहिरो स्पेल्डंर काळी पांढरा
बजाज डिस्कव्हर काळी लाल
होंडा शाईन लाल पांढरी
होंडा युनिकॉर्न सिल्व्हर रंग
हीरो HF डिलक्स निळा पांढरा
बजाज प्लॅटीना काळी पांढरी
HF डिलक्स निळा पांढरा रंग
बजाज पल्सर १५० सी.सी. काळी
निळी
हीरो स्लेंडर प्लस काळा पांढरा
हिरो पॅशन प्रो काळया रंगाची
हीरो स्लेंडर प्लस पांढरा पटटा
बजाज प्लॅटीना पांढरा रंगाची गाडी सापडली आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक राकेशजी ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक
स्वाती भोर मँडम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदर्शानाखाली राहुरी पोलीस
स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे पोना/ राजेंद्र नागरगोजे, पोकॉ/ सचिन ताजने, पोकॉ/ आजिनाथ
पाखरे, पोकॉ/ प्रमोद ढाकणे, पोकॉ/ गावर्धन कदम,पोकॉ/ नदिम शेख, पोकॉ/ रोहित पालवे, पोकॉ/ सचिन
बर्डे, पोकॉ/ भाऊसाहेब शिरसाठ, चापोकॉ/ लक्ष्मण खेडकर यांचे पथकाने केली आहे.
राहुरी पोलीस स्टेशन व्दोर नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, आपली वाहने सुरक्षित ठिकाणी
पार्क करावीत तसेच कोणालाही संशयित ईसम किंवा विना नंबर प्लेट मोटार सायकल आढळुन आल्यास
राहुरी पोलीस स्टेशनला फोन नं 02426232433 यावर संपर्क करावा.