संतोष औताडे- मुख्य संपादक ,नेवासा दिनांक- 11/05/2023
सविस्तर माहिती –
नेवासा तालुक्यातील बाभुळखेडे गावच्या सरपंच सौ.अश्विनी ज्ञानेश्वर औताडे यांना ग्रामविकासातील उल्लेखनिय कार्याबद्दल सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांचे वतीने दिला जाणारा २०२३ चा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
माऊली संकुल सभागृह, अहमदनगर येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात आदर्शगाव पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे, अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर ना.सौ.रोहिणीताई शेडंगे,सरपंच सेवा संघाचे संस्थापक, बाबासाहेब पावसे आदी मान्यवराच्यां उपस्थितीत सौ.अश्विनी औताडे यांना सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सरपंच सौ.अश्विनी औताडे यांना या अगोदर मागील वर्षी कोरोना काळातील उल्लेखनिय कार्याबद्दल राज्यस्तरीय कोरोना योद्धा -आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेला आहे.
सरपंच सौ.अश्विनी औताडे यांनी आपले पती ज्ञानेश्वर औताडे यांच्या मदतीने बाभुळखेडा गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन विविध योजना राबवल्या. तसेच सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकासकामे करत गावात सर्वरोग निदान शिबिर, नेञरोग तपासणी यासांरखे आरोग्य शिबीर घेतले.कोरोना सारख्या महाभयंकर काळात आरोग्य विभागाच्या सहकार्याने घरोघरी जाउन प्रत्येकाची कोरोना चाचणी घेऊन गावात अनेकवेळा कोरोना लसीकरणाचे शिबीर घेत गावात १००% लसीकरण करुन घेतले. गावातील सर्व आजी – माजी सैनिक यांचा सन्मान करुन अनोखा उपक्रम राबवला.तसेच गावातील विविध विकासकामासांठी मोठ्या प्रमाणात निधी आणुन ग्रामविकासाचा आलेख चढता ठेवला.याच उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन सौ.अश्विनी औताडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार लोकाभिमुख योजना राबविण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे व हा पुरस्कार समस्त बाभुळखेडे ग्रामस्थांना समर्पित करीत असल्याचे सरपंच सौ.अश्विनी औताडे यांनी सांगितले.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी मंत्री तथा मा.आमदार शंकरराव गडाख , जिल्हा परीषद अर्थ समितीचे मा.सभापती सुनिल गडाख, मा.सभापती सौ.सुनिताताई गडाख, उदयन गडाख आदीनीं सरपंच सौ.अश्विनी औताडे यांचे अभिनदंन केले.