संतोष औताडे-मुख्य संपादक नेवासा दिनांक- 10/05/2823
थेरगांव शिवार, ता. कर्जत येथे दरोड्याचे तयारीत असलेली दोन आरोपी व एक
अल्पवयीन यांची टोळी तलवार, लाकडी दांडके, गलोल व मिरचीपुड अशा
साधनासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर
यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिह्यातील फरार व पाहिजे
आरोपींची माहिती घेवुन त्यांचे विरुध्द कारवाई करणे बाबत यांना आदेश दिले होते.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/भाऊसाहेब काळे,
पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर, बापुसाहेब फोलाणे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना/ रविंद्र कर्डीले, विजय
ठोंबरे, पोकॉ/बाळु खेडकर, मयुर गायकवाड, बाळासाहेब गुंजाळ व चापोहेकॉ / चंद्रकांत कुसळकर अशा
पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या होत्या.
नमुद सुचना प्रमाणे पथक कर्जत तालुक्यातील मिरजगांव परिसरात फिरुन पाहिजे व फरार आरोपींचा
शोध घेत असताना पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी पथकास कळविले की, आताच गुप्तबातमीदारा मार्फत
माहिती मिळाली की, घोगरगांव ते कोंभळी जाणारे रोडवर, थेरगांव शिवारात, लिंबाचे बागेमध्ये ६ ते ७
इसम दरोडा घालण्याचे तयारीत लिंबाचे बागेत बसलेले आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर
माहिती मिळाल्याने नमुद ठिकाणी जावुन खात्री करून कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने नमुद
ठिकाणी जावुन वाहन रस्त्याचे कडेला लावुन पायी चालत बॅटरीचे उजेडात खात्री केली असता काही इसम
अंधारात दबा धरुन बसलेले दिसले पोलीस पथक अचानक छापा घालुन पकडण्याचे तयारी असताना
संशयीत इसम पोलीस पथकाची चाहुल लागताच पळुन जावु लागले पथकाने लागलीच पळत जावुन तीन
इसमांना ताब्यात घेतले व चार इसम अंधाराचा व झाडा झुडपाचा फायदा घेवुन पळुन गेले. ताब्यात
घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) निकम किंद्राश्या भोसले वय ३०,
रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा, २) श्रीनिवास मधु काळे, वय ४५, रा. वांळुज, ता. नगर व ३) वांळुज, ता.
नगर येथे राहणारा एक अल्पवयीन मुलगा असे सांगितले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेत त्यांचे अंगझडती
मध्ये एक तलवार, दोन लाकडी दांडके, एक गलोल व मिरचीपुड मिळुन आल्याने त्यांचेकडे सखोल
चौकशी करता त्यांनी मिरजगांव परिसरात कोठेतरी दरोडा घालण्याचे तयारीत एकत्र जमल्याची कबुली
दिल्याने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे पळुन गेलेल्या आरोपींची नावे विचारली असता
त्यांनी ४) स्वामी सर्जेराव चव्हाण, रा. घोसपुरी, ता. नगर (फरार) ५) रमेश सुरेश चव्हाण (बेलदार) रा.
सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा (फरार) ६) सुर्यभान कुंडलीक काळे ऊर्फ टोण्या रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा
(फरार) व ७) अशोक किंद्राश्या भोसले रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा ( फरार) असे असल्याचे सांगितले.
पळुन गेलेल्या आरोपींचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द
मिरजगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. १४२ / २०२३ भादविक ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे दरोडा
तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरजगांव पोलीस स्टेशन करीत आहे. सदर कारवाई मा.राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगरमा.प्रशांत खैरे साहेब अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने कारवाई केली.