शेवगांव तालुक्यात बेकायदेशिर गांजा शेतीवर छापा टाकून २,५०,५००/- रु. किं. ची ३३५ लहान मोठी गांजाची झाडे जप्त.
·संतोष औताडे -मुख्य संपादक दिनांक :- १०/०५/२०२३
शेवगांव तालुक्यातील वाडगव्हाण शिवारामध्ये बेकायदेशिर गांजा शेतीवर छापा
टाकून २,५०,५००/- रु. किं. ची ३३५ लहान मोठी गांजाची झाडे जप्त·
स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कामगिरी.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक ०९/०५/२०२३ रोजी पोनि / श्री दिनेश आहेर, स्थानिक
गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, शेवगांव तालूक्यातील
वाडगव्हाण शिवारामध्ये अशोक काजळे याने त्याचे शेतामध्ये बेकायदेशिररित्या गांजाच्या झाडांची लागवड
केलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस
अधिक्षक, अहमदनगर यांना कळवून त्यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील
पोसई/तुषार धाकराव, सफौ/ विष्णु घोडेचोर, पोहेकॉ/ देवेंद्र शेलार, पोना / संतोष लोढे, पोकॉ/शिवाजी ढाकणे,
मपोना/ भाग्यश्री भिटे, चापोहेकॉ/ बबन बेरड तसेच पोना / रविंद्र कर्डीले व पोकॉ/किशोर शिरसाठ अशांनी
मिळून शेवगांव येथे जावून स्थानिक पोलीस, पंच व इतर साधने सोबत घेवुन वाडगव्हाण, ता. शेवगांव
येथील अशोक काजळे याचे शेतात जावुन पहाणी करुन मिळालेल्या माहितीची खात्री केली असता मक्याचे
शेतामध्ये गांजाची झाडे दिसुन आल्याने सदर ठिकाणी छापा टाकुन आरोपी नामे १) अशोक सुदाम काजळे
रा. वाडगव्हाण, ता. शेवगांव याचे कब्जातील शेतामधुन २,५०,५००/- रुपये किंमतीच्या गांजाची ३३५
लहान मोठी हिरवी झाडे कारवाई करुन जप्त करण्यात आलेली आहे.
वरील प्रमाणे शेवगांव तालुक्यातील वाडगव्हाण येथे कारवाई करुन २,५०,५००/- रु. किंमतीची
३३५ गांजाची लहान मोठी हिरवी झाडे जप्त करुन त्या बाबत पोना / संतोष शंकर लोढे ने. स्थानिक गुन्हे
शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन शेवगांव पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं.
४०५/२०२३ एन. डी. पी. एस. कायदा कलम २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील
कारवाई शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.