मोबाईल शॉपी मार्फत चोरीचे मोबाईल विक्री करणारी टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस स्टेशन यांची संयुक्त कामगिरी.

संतोष औताडे- मुख्य संपादक ,नेवासा दिनांक -14/04/2023
सविस्तर माहिती -फिर्यादी नामे दिंगबर शंकरसिंग परदेशी रा गावडे मळा पाईपलाईन रोड अहमदनगर यांचेकडे असणारा शासकिय
कामकाजाकरिता असलेला सॅमसंग कंपनीचा ए २० मोबाईल हा कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतःच्या फायदयाकरिता गर्दीचा
फायदा घेवुन चोरुन नेलेबाबत कोतवाली पोलीस स्टेशन T१०१८/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात
आलेला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नमुद गुन्हयाबाबत मा. श्री. राकेश ओला पोलीस अधिक्षक साो. अहमदनगर यांनी
सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांना समांतर तपास करणेबाबत सुचना दिल्याने सायबर पोलीस
स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोसई प्रतिक कोळी,
पोहेकॉ/ उमेश खेडकर, पोहेकॉ/ राहुल हुसळे, पोना / दिगंबर कारखेले, पोना / मल्लिकार्जुन बनकर, पोना/ निळकंठ
कारखेले, पोकॉ / अरुण सांगळे, मपोहेकॉ / सविता खताळ, मपोकॉ / पुजा भांगरे, चापोहेकॉ / वासुदेव शेलार व स्थानिक
गुन्हे शाखेचे पोहेकॉ/ दत्तात्रय गव्हाणे, पोहेकॉ/ मनोहर गोसावी, पोकॉ / मच्छिद्र बर्डे यांचे पथकाने नमुद गुन्हयातील चोरी
गेलेल्या मोबाईलबाबत तांत्रिक विश्लेषण केले असता नमुद मोबाईल हा पोपट सुहास जगधने रा कुंभेफळ ता आष्टी जि. बीड
याचेकडे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मा. पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहेर साो. यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी
मिळाली कि, नमुद आरोपी हा धानोरा येथे आलेला आहे. त्यानुसार वरील इसमास ताब्यात घेवून त्याची चौकशी केली
असता त्याने त्याचे नाव १) पोपट सुहास जगधने रा कुंभेफळ ता आष्टी जि. बीड असे सांगितले. त्याचेकडे वरिल नमुद
गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाईल मिळुन आल्याने त्याचेकडे अधीक चौकशी केली असता त्याने सदरचा मोबाईल हा
२) अमोल होळकर रा.धानोरा ता आष्टी जि.बीड याचे समर्थ मोबाईल शॉपी या दुकानातुन घेतल्याचे कळविले. अमोल
होळकर याचेकडे नमुद मोबाईल संदर्भात चौकशी केली असता त्याने सदरचा मोबाईल हा ३) महेश कर्डिले रा चिंचोली ता
आष्टी जि.बीड याचेकडुन घेतला असल्याचे कळविल्याने महेश कर्डिले यास ताब्यात घेवून अधिक विचारपुस करता त्याने
वरिल गुन्हयातील मोबाईल हा अमोल होळकर यास दिलेबाबत कबुली देवुन त्याने इतरही ओळखीच्या मोबाईल शॉपीमध्ये
त्यामध्ये ४) नागनाथ कारभारी जाधव यांची साईनाथ मोबाईल शॉपी, रा कडा ता आष्टी ता बीड ५) मनिष पैलाज माणिक
रा. अहमदनगर यांची येथील माणिक मोबाईल शॉपी, दिल्लीगेट ६) शैलेश बाळकृष्ण लाटणे यांची किरण मोबाईल शॉपी
रा. आदर्शनगर कल्याण रोड अहमदनगर ६) आजिनाथ महादेव वायभासे यांची जय गणेश मोबाईल शॉपी रा. शिंगणापुर रोड
७सोनई यांना विकलेले / विक्री करता दिलेले असल्याबाबत सांगुन सदरचे मोबाईल हे ८) झहीद सय्यद खलीद रा मुकुंदनगर
याचेकडुन घेतलेले असल्याचे सांगितले त्यावर अ.नं. २ ७ यांचे ताब्यातुन एकुण २७ मोबाईल ३,२४,०००/-रुकिमतीचा
मुद्देमाल जप्त करुन कोतवाली पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आलेले असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत
आहेत.