राजकिय
Trending

भेंडा ते सलाबतपुर रस्त्याचे काम लवकर पुर्ण करा . अन्यथा आमरण उपोषण करणार महिला सरपंच आक्रमक भूमिकेत

संतोष औताडे-मुख्य संपादक ,नेवासा दिनांक-12/04/2023


सविस्तर माहिती – नेवासा तालुक्यातील भेंडा ते सलाबतपुर सत्याचे रखडलेले काम हा महत्वाचा विषय बनला आहे. याच भेंडा- गोंडेगाव- सलाबतपुर रस्त्याच्या कामासाठी नेवासा तालुक्यातील महिला सरपंचांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.या बाबतचे निवेदन तहसीलदार तसेच सामाजिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले आहे.  या रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी वारंवार निवेदन दिले होते.तसेच उपोषण देखील करण्यात आले होते.परतुं घोडे कुठे आडले तेच कळत नाही. या रस्त्याच्या कामासाठी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की भेंडा-गोंडेगाव-सलाबतपुर रस्त्याला मंजूरी मिळून चार वर्षे
पूर्ण झाली आहे. वर्क ऑर्डरही मिळाली आहे. फक्त कॉन्ट्रॅक्टरची दिरंगाई व बेजबाबदारपणा यामुळे
आजपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. जो रस्ता झाला आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. रस्त्याचे
काम मात्र अर्धवट स्थितीत आहे. या कामासाठी अनेक वेळा उपोषण, मोर्चे व आंदोलने झालेली
आहेत. तरी देखील संदर्भीय काम मात्र अपूर्णच आहे. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी व रोष निर्माण झाला
आहे. या रस्त्यावर अनेकवेळा छोटे मोठे अपघात झालेले आहेत. या रस्त्याचे खडीकरण झाले
आहे. मात्र डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे जनतेची अतिशय गैरसोय होत आहे.
तरी कृपया लवकरात लवकर भेंडे-गोंडेगाव- सलाबतपुर या रस्त्याचे काम तीन ते चार दिवसात
चालु करावे अन्यथा सोमवार दि. १७/०४/२०२३ रोजी भेंडा बु।। बस स्टॅण्डवर भेंडा बु।।, भेंडा खु।।,
गोंडेगांव सौंदाळा, नजिक चिंचोली, सलाबतपुर या पंचक्रोशीतील गावच्या सर्व महिला
सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील नागरिक हे रस्ता रोको व आमरण उपोषण करतील याची नोंद घ्यावी. असे या निवेदनात म्हटले आहे.या प्रसंगी

१) सौ.प्रा.उषा लहानू मिसाळ (सरपंच, भेंडा बु )
२) सौ. वर्षा वैभव नवले (सरपंच, भेंडा खु।
३) सौ. प्रियंका शरद आरगडे (सरपंच, सौंदाळा)४) सौ. वनमाला ज्ञानेश्वर चावरे (सरपंच, न. चिंचोली)
५) सौ.कविता किशोर शिरसाठ (सरपंच, गोंडेगाव) इ.महिला सरपंच
उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे