मोटार सायकल चोरी तसेच मेडीकल मधील रोख रक्कम चोरी करणारी टोळी जेरबंद सुपा पोलीसांची कामगिरी.
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक-14/04/2023
सविस्तर माहिती –
सुपा पो स्टे.
सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत
दि.10/04/2023 रोजी जातेगाव ता. पारनेर येथील यात्रेमधुन संजय बाळासाहेब
दळवी यांची स्प्लेंडर मो.सा नं MH 16 BN 6396 ही चोरी झालेबाबत सुपा पोलीस स्टेशन
गु.र.नं. 127/2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे मो. सा चोरी झालेबाबत गुन्हा दाखल होता.
मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला
सो. यांनी सुचना दिल्याने पो.नि श्री ज्योती गडकरी यांनी सदर गुन्हयाचे तपासकामी पथक
नेमण्यात आले. सदर गुन्हयाचे तपासात असताना गुन्हायत चोरी गेलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर
मो.सा.नं MH 16 BN 6396 ही घोसपुरी ता.अ.नगर येथे बापु उर्फ संग्राम साहेबराव कव्हाणे व
विठ्ठल संजय घोडके यांनी चोरी करुन सदर मो.सा वापरत असल्याचे गोपनिय बातमीदारामार्फत
बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ घोसपुरी येथे दाखल होऊन गुन्ह्यात चोरीस गेलेली
मो.सा व आरोपी यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक विचारपुस केली असता आरोपींनी
दि. 07/04/2023 रोजी बेलवंडी ता. श्रीगोंदा येथे मेडीकल मधील काऊंटरच्या ड्राव्हर
मधुन चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर बाबत बेलवंडी पो.स्टे 113/2023
भा.द.वि.कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड
मध्ये आरोपींकडुन खालील मो.सा हस्तगत करण्यात आल्या आहेत.
1. स्प्लेंडर NXG मो.सा नं MH.17.AS.1290 चॅसी नं MBLHA 12EMB9M06546
2. होंडा शाईन काळ्या व लाल रंगाची चॅसी नं ME4JC368A98080409
3. स्प्लेंडर मो. सा नं MH 16 BN 6396 तिचा चॅसी नं. MBLHAIOBWFHG70107, इंजिन
नं.’HA1OEWFHG12453
4. काळ्या रंगाची स्प्लेंडर मो.सा चॅसी नं MBLHA10EE89H26881
आरोपी नामे संग्राम उर्फ बापु साहेबराव कव्हाणे रा.घोसपुरी ता.अ. नगर याचेवर दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा.पोलिस अधिक्षक राकेश ओला साहेब, पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे साहेब, अनिल कातकडे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी नगर ग्रामीण, यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती गडकरी मॅडम पोलीस निरीक्षक सुपा पोलीस स्टेशन व पदाधिकारी यांनी कामगिरी केली आहे.