जिजामाता शास्ञ व कला महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान विषयक व्याख्यान आयोजित
संतोष औताडे- (मुख्य संपादक नेवासा ) दिनांक-26/02/2023
सविस्तर माहितीसाठी- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्ञ व कला महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानाचे आयोजन 24 व 25 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले होते. या अभियानात शेवगाव पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक मा. श्री आशिष शेळके साहेब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महिला विषयक कायदे यासंबंधी माहिती देण्यात आली. महिलांना समाजात ञास देणे हुंडाबळी सारख्या घटना घडत असतात. कॉलेज मध्ये मुलींच्या छेडछाड, यासारख्या घटना रोखण्यासाठी महिला, मुलींना आज सक्षम होण्याची गरज आहे असेही सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी सांगितले.स्ञी ही फक्त स्ञी नसुन ती एक अमृत शक्ती आहे. स्ञी एक अदभुत शक्ती असुन निर्भय कन्या होण्यासाठी सामाजिक जडणघडणीचा फार मोठा वाटा आहे. भारतीय संविधान संहीता नुसार महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. फक्त आज गरज आहे ती निर्भय कन्या ची समाजातील अन्याय सहन न करता त्याला प्रतिकार करण्याची गरज असल्याचे यावेळी आशिष शेळके यांनी सांगितले. यावेळी अनेक विद्यार्थिनी यांनी आपल्या समस्या व प्रश्न यांच्या विषयी चर्चा केली. या निर्भय कन्या अभियान प्रसंगी दुसऱ्या दिवशी प्रा.डॉ.शिल्पा नरवडे यांचे स्ञी स्वास्थ व समस्या या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी व समस्या विषयक माहिती देण्यात आली. तीस-या सञामधे स्व संरक्षण विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यासाठी मा.प्रविन कुदळे सर यांनी विविध संरक्षण विषयक प्रत्यशिके सादर करून दाखवली . महिलांनी आपले स्व संरक्षण कसे करावे याविषयी माहिती देण्यात आली. या निर्भय कन्या अभियान व्याख्यान प्रसंगी जिजामाता शास्ञ व कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सासवडे सर, प्रा.डॉ. संभाजी काळे सर , प्रा.खरड सर, प्रा.भिञे सर,प्रा.डॉ. भोसले मॅडम,प्रा.पोकळे मॅडम , संतोष औताडे (पञकार),प्रा.डॉ.मेहेर सर, तांबे सर, प्रा.वाकचौरे सर,प्रा मडके मॅडम,प्रा. मस्तके सर, प्रा.साठे मॅडम जिजामाता महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तांबे सर यांनी केले तर आभार प्रा. पडोळ सर यांनी मानले.