गुन्हेगारी
Trending

दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी घातक शस्त्रासंह जेरबंद, 5 लाख 12 हजार 800 रु. किं.चा मुद्देमाल जप्त नगर तालुका पोलीसांची कामगीरी

(संतोष औताडे- मुख्य संपादक) दिनांक-11/02/2023

दि. 11/02/2023 रोजी नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत खंडाळा गावचे शिवारात काही इसम हे घातक शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीने संशयितरित्या फिरत आहेत. अशी माहीती मिळाल्याने खंडाळा गावचे परिसरात सदर संशयितरित्या फिरणा-या इसमांचा शोध घेत असतांना पहाटे 02/30 वा. चे सुमारास 05 संशयित इसम हायवेच्या दिशेने पळतांना दिसुन आले. त्यापैकी चार इसम हायवेलगत लावलेल्या एका करड्या रंगाचा क्रुझर गाडी क्र.MH-20- BY-3468 ही मध्ये बसले व एक इसम हा अंधाराचा फायदा घेऊन पळून जाताना दिसला. तसेच सदर क्रुझर गाडीही नगरच्या दिशेने पळून जात असताना आम्ही पोलीस स्टाफ व खंडाळा गावचे विकास लोटके व इतर ग्रामस्थ यांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून सदर क्रुझर गाड़ी ही पुणे हायवेवरील केडगाव बायपास चौकात पहाटे 03/00 वा. चे सुमारास थांबविली व सदर गाडीच्या जवळ जाऊन गाडीतील इसमांना ताब्यात घेतले व त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे 01) सिकंदरसिंग शक्तीसिंग ज्युनि, वय- 38 वर्षे, रा. आलाना, (ब्रुकबॉन्ड जवळ), गेवराई,ता.जि. | औरंगाबाद, 02) जितेंद्रसिंग संतोषसिंग टाक, वय 30 वर्षे, रा. आलाना, (ब्रुकवान्ड जवळ), गेवराई, ता. जि. औरंगाबाद, 03) दलसिंग बालासिंग टाक, वय-19 वर्षे, रा. आलाना (बुकबॉन्ड जवळ), गेवराई, ता. जि. औरंगाबाद 04) शाह अन्सार मंजुर शाह, वय 21 वर्षे, रा. चितेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद असे असल्याचे सांगितले. तसेच त्यांचेकडे पळून गेलेल्या । इसमाबाबत विचारपुस करता ते त्याचे नाव सांगत नसुन उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांचेजवळ क्रुझर गाडीमध्ये त्यांचे कब्जात क्रुझर गाडी, विविध प्रकारचे लोखंडी पान्हे, लोखंडी रॉड, कोयते, स्क्रुड्रायव्हर, रस्सी, लोखंडी साखळी, बिळा. लोखंडी पाईप, लोखंडी हुक पाईप, असा 5 लाख 12 हजार 800 रु. कि.चा मुद्देमाल मिळून आल्याने वरील इसमांना मुद्देमालासह पोलीस स्टेशनला आणुन त्यांचेविरुद्ध भा.द.वि. कलम 399,402, आर्म अॅक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्यातील आरोपीतांवर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

*आरोपी नामे सिकंदरसिंग शक्तीसिंग ज्युनि. वय 38 वर्षे, रा. आलाना, (कबॉन्ड), गेवराई, ता. जि. औरंगाबाद याच्यावरती 4 गुन्हे दाखल आहेत*

*आरोपी नामे- जितेंद्रसिंग संतोषसिंग टाक, वय 30 वर्षे, रा. आलाना, (ब्रुकबॉन्ड जवळ), गेवराई, ता. जि. औरंगाबाद या आरोपी वरती 11 गुन्हे दाखल आहेत* अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढवळे, अंमलदार संतोष लगड,कैलास इथापे,आनंद घोडके,सोमनाथ वडणे,संभाजी बोराडे,विक्रांत भालसिंग,विशाल टकले, चालक विकास शिंदे. होमगार्ड भाऊसाहेब पवार यांच्या पथकाने केलेली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे